घरमुंबईTikTok व्हिडिओवर हसाल तर तुमच्यासोबतही 'हे' घडू शकतं!

TikTok व्हिडिओवर हसाल तर तुमच्यासोबतही ‘हे’ घडू शकतं!

Subscribe

अब्दुल्ला याला वैद्यकीय तपासणीसाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्या पोटावर 17 टाके पडले असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.

टिकटॉक व्हिडिओ तयार करीत असताना जोरात हसल्याचा राग मनात धरून दोन तरुणांवर चार जणांनी धारदार शस्त्राने मारहाण केली आहे. चारही तरूण पसार झाले आहेत. मुंब्रा परिसरात घडलेल्या या घटनेची तक्रार मुंब्रा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

२८ मे रोजी टेम्पोचालक युसूफ अकबर सलकी यांचा भाऊ अब्दुल्ला आपल्या मित्रासमवेत राहत्या इमारतीखाली उभे होते. त्याच दरम्यान दुसरीकडे याच इमारतीच्या खाली काही अंतरावर आवेश, कैफ, मोहिश आणि अशरफ हे टिकटॉक व्हिडीओ बनवीत होते. त्यावेळी अब्दुल्ला आणि त्याच्या मित्र जोरात हसले. ते आपल्यालाच हसत असल्याचा समज करून याचा राग मनात धरून चौघांनी अब्दुल्ला याला बोलावले आणि हसण्याबाबत जाब विचारला. आम्ही आपसात हसत होतो तुम्हाला हसलो नाही असे सांगूनही या चौघांनी त्यांचे ऐकले नाही. त्यांनी अब्दुल्ला याला मारझोड करण्यास सुरुवात केली. तेव्हा अब्दुल्ला याने आपला भाऊ युसूफ याला बोलावले. मात्र त्या चौघांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली.

- Advertisement -
टिकटॉक व्हीडीओवर हसला म्हणून झाला हल्ला.

त्याचवेळी ओवेसने त्याच्या जवळच्या धारदार शस्त्र चॉपरने पोटाच्या बारगड्यावर वार केला. यात अब्दुल्ला गंभीर जखमी झाला. त्यातच मोहिशने लोखंडी रॉडने अब्दुलच्या डोक्यात प्रहार केले. जखमी अवस्थेत अब्दुल्ला मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेला. अब्दुल्ला याला वैद्यकीय तपासणीसाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्याच्या पोटावर 17 टाके पडले असल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. या प्रकरणात मुंब्रा पोलीस ठाण्यात आरोपी ओवेश, कैफ ,मोहिश ,अशरफ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी भादंवि 323,324,326,34, 504 आणि 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -