घरमुंबईलिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा नाही

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा नाही

Subscribe

लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा विचार नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले. शिवाय, लिंगायत हा वेगळा धर्म नसून हिंदु धर्माचा एक पंथ असल्याचे उत्तर राज्य सरकारने विधानसभेत दिले.

लिंगायत वेगळा धर्म नसून हिंदु धर्मातील पंथ आहे. शिवाय, लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा विचार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. विधानसभेत लेखी उत्तराद्वारे राज्य सरकारने हे उत्तर दिले. नागपुरात सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यावेळी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे उत्तर दिले. लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याबाबत आशिष शेलार, पराग आळवणी , राजेश टोपे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आणि जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी उत्तर देताना लिंगायत वेगळा धर्म नसून हिंदु धर्मातील पंथ आहे. त्याला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा विचार नसल्याचे विनोद तावडे यांनी लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले. कर्नाटकात लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा दिल्यानंतर राज्यात देखील लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देणार का? अशी चर्चा सुरू होती. शिवाय, विधानसभेत देखील याबद्दल प्रश्न उपस्थित केला गेला. त्यावर राज्य सरकारने आपले उत्तर विधानसभेत दिले आहे.

कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाला धर्माचा दर्जा

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना काँग्रेसने लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा दिला. त्यावरून वाद देखील झाले. शिवाय, काँग्रेसने राजकीय फायद्यासाठी ही चाल खेळल्याचे आरोप देखील झाले. लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देऊन काँग्रेसला त्याचा राजकीय फायदा झाला नाही. उलटपक्षी लिंगायत समाजाने भाजपच्याच पदरात मते टाकली. त्यामुळे काँग्रेसची ही चाल कोणत्याही प्रकारे काँग्रेससाठी फायदेशीर ठरली नाही. त्याच पार्श्वभूमिवर आता महाराष्ट्रात देखील लिंगायत समाजाला स्वतंत्र्य दर्जा मिळणार का? अशी चर्चा सुरू होती. याच प्रश्नावर नागपुरातील पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केले गेले. त्यावर उत्तर देताना राज्य सरकारने लिंगायत समाज वेगळा धर्म नसून हिंदु धर्मातील पंथ असल्याचे स्पष्ट केले. शिवाय, लिंगायत समाजाला वेगळ्या धर्माचा दर्जा देण्याचा कोणताही विचार नसल्याचे राज्य सरकारने लेखी उत्तराद्वारे स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -