घरमुंबईमहाडमधील स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला

महाडमधील स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाचा साक्षीदार हरपला

Subscribe

थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊ लकेश्री यांचे निधन

महाडच्या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीतले प्रमुख सेनानी रघुनाथ उर्फ भाऊ लकेश्री यांनी बुधवारी सायंकाळी नाते येथे वयाच्या १०८ व्या वर्षी अंतिम श्वास घेतला. इतिहास घडविणारेच खरा इतिहास सांगू शकतात असे भाऊ लकेश्री समाजाला पोटतिडकीने सांगत असंत. महाड येथील ब्रिटीशांच्या विरोधातील शेतकरी लढ्याचा प्रत्यक्ष साक्षिदार असलेल्या या स्वातंत्र्यसेनानीच्या जाण्याने महाडकरांवर शोककळा पसरली आहे. गुरुवारी सकाळी त्यांच्यावर शासकीय इतमामाने अंतिम संस्कार करण्यात आले.

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण देशात भारत छोडो ही चळवळ जोमाने सुरू होती. देशात सर्वत्र ब्रिटीश सरकारच्या विरोधात असहकार आणि आंदोलने सुरु होती. महाड मध्येदेखील क्रांतीसिंह नानासाहेब पूरोहीत यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य लढ्याचे हे युध्द सुरु होते. या लढ्यात त्याच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या काही प्रमुख कार्यकर्त्या मध्ये भाऊ लकेश्री यांचा प्रमुख सहभाग होता.

- Advertisement -

नाना पुरोहीत हे मवाळ विचारांचे तर भाऊ जहाल विचारांचे, मात्र दोघांच्या लढ्याचा उद्देश केवळ एकच होता तो भारताला जुलमी ब्रिटीश राजवटीपासुन स्वांतंत्र्य मिळवुन देणे. यासाठी १० सप्टेंबर १९४२ साली नानांच्या नेतृत्वाखाली महाड मध्ये शेतकर्यांचा मोर्चा काढण्यात आला होता. पिंपळपार येथे आल्या नंतर या मोर्चेकरांवर ब्रिटीशांनी गोळीबार व लाठीचार्ज केला होता. त्यात पाच स्वातंत्र्य सैनिक शहिद झाले. या मोर्चाची मुख्य जबाबदारी भाऊंनी सांभाळली होती.

स्वातंत्र्य लढ्यातील या सर्व घटना भाऊ आवडीने आणि पोटतिडकिने तरुणांना सांगत असत. त्यांच म्हणन एवढच असे की, असंख्य बलिदाने आणि त्यागाने मिळालेल हे स्वातंत्र्य चिरकाल टिकावे आणि मिळालेल्या स्वांत्र्याचा फायदा तळागाळातील गोरगरीबांच आयुष्य सुधारण्या कामी व्हावा एवढीच माफक अपेक्षा त्यांची होती.

- Advertisement -

स्वातंत्र्य लढ्याचा साक्षीदार असलेल्या रघुनाथ उर्फ भाऊ लकेश्री यांचे बुधवार दि ३ जुलै रोजी सायंकाळी नाते येथील त्यांच्या राहत्या घरी दुखःद निधन झाले. भाऊ लकेश्री यांच्या दुखःद निधनाने महाडवर शोककळा पसरली असुन, गुरुवार दि ४ जुलै रोजी सकाळी १० वा. नाते येथील वैकुंठभुमीत शासकीय इतमामात त्यांच्या अंतिमसंस्कार करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -