घरमुंबईराजकीय लाभासाठी संघटनेवर दबाव टाकणे अयोग्य; CBI तपास बंदीवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

राजकीय लाभासाठी संघटनेवर दबाव टाकणे अयोग्य; CBI तपास बंदीवर गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

Subscribe

महाराष्ट्र शासनाने एका अद्यादेशाद्वारे सीबीआयला राज्यात तपास करण्याची परवानगी काढून घेतली असून त्यामुळे सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. राज्याच्या गृहविभागाने याबाबत काल, बुधवारी आदेश काढला. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली असून, सीबीआयने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने चौकशी केली आहे. परंतु राजकीय लाभ घेण्यासाठी संघटनेवर दबाव निर्माण करणे योग्य नाही, म्हणून आम्ही हा निर्णय घेतला, असल्याचे गृहमंत्र्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

सीबीआयला आता राज्यात येऊन तपास करण्यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तथापि, सीबीआयकडून राज्यात तपासाची परवानगी काढून घेण्यात आली असली तरी सध्या सुरू असलेली अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरण आणि सीबीआयने टीआरपी घोटाळ्यात नोंदवलेल्या एफआयआरच्या चौकशीवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. राज्य सरकारने सीबीआयला त्यांच्या अधिकार क्षेत्रातील केंद्रीय सरकारी अधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांची चौकशी करण्याची दिलेली परवानगी मात्र मागे घेण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्यावतीने गृहखात्याकडून हा अद्यादेश काढण्यात आला आहे.

हेही वाचा –

कोरोनाच्या सावटामुळे यंदा सोन्याची जेजुरी सुनी-सुनी; ‘मर्दानी दसरा’ ही रद्द!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -