घरमुंबई#WorldNoTobaccoDay: महाराष्ट्र कमी धूम्रपान करणारे राज्य

#WorldNoTobaccoDay: महाराष्ट्र कमी धूम्रपान करणारे राज्य

Subscribe

ग्लोबल ॲडल्ट टू टोबॅको या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र सर्वात कमी धूम्रपान करणारे राज्य म्हणून समोर आले आहे.

तंबाखूजन्य पदार्थांचं सेवन आणि त्याच्या वाढत्या व्यसनातून कर्करोगाचे प्रमाण आणखी वाढले आहे. राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राज्यात २०१७-१८ पासून राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत २०१७च्या गॅट्स-२ (ग्लोबल ॲडल्ट टू टोबॅको) या सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्र सर्वात कमी धूम्रपान करणारे राज्य म्हणून समोर आले आहे.

पण, हे प्रमाण शून्यावर आणण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत. यासाठी वेगवेगळ्या मोहिम राबवल्या जात आहेत. २००९-१० च्या ग्लोबल अॅडल्ट वन टोबॅको सर्व्हेमध्ये महिलांमध्ये तंबाखूचं सेवनाचं प्रमाण १०.५ टकक्यांवरुन ५. ८ टक्क्यांवर आलं आहे. तर, पुरुषांमध्ये ४८.८ टक्क्यांवरुन ३६.६ टक्क्यांवर आलं आहे. म्हणजेच तंबाखू सेवनाचं प्रमाण कमी होत असल्याचं समोर आलं आहे.

- Advertisement -

आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

भारतात साधारणतः आठ ते नऊ लाख व्यक्ती तंबाखूमुळे दगावतात. तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, नपुंसकत्व यासारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती राज्यशासन करत असून, पानाच्या दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांसोबतच अन्य खाद्य पदार्थ, शितपेये, चॉकलेट आणि बिस्किटे या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली तरीही अनेक दुकानांमध्ये सर्रास तंबाखूजन्य पदार्थ विकले जातात. तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याच्या दिशेने आपण सहकार्य करायला हवे. तंबाखू विरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रूजवणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

तंबाखूविरोधी मोहिम ही अधिक तीव्र करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वांचं सहकार्य असायला हवं. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राज्यभरात ३७४ तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली असून या केंद्रांमध्ये २ लाख १ हजार ६९२ लोकांची नोंद झाली आहे. पण, तंबाखू सोडलेल्यांची संख्या ९ हजार १६ एवढी आहे. ही संख्या वाढवणं गरजेचं आहे.
एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री
” मौखिक आरोग्य मोहिमेअंतर्गत २ कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तंबाखू सेवनामुळे तोंडाच्या कर्करोगाचे रुग्ण वाढत आहेत तर दुसरीकडे सिगारेटमुळे फुफ्फुसाच्या कर्करुग्णांमध्ये वाढ होते आहे. तंबाखू मृत्यूस कारणीभूत ठरत असल्याचं माहित असूनही अनेक जण त्याच्या आहारी जात आहेत. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाचं प्रमाण कमी झालं आहे. पण, यावर समाधान न मानता तंबाखू सेवन रोखण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे’’
डॉ. अनुपकुमार यादव, आरोग्यसेवा आयुक्त
‘‘तंबाखूवर बंदी घालणं ही सरकारची जबाबदारी असली तरी सार्वजनिक ठिकाणी कोणी धूम्रपान करत असल्यास त्यांना रोखणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे. हे विसरून चालणार नाही.’’
डॉ. साधना तायडे, असंसर्गजन्य विभागाच्या सह-संचालक
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -