घरमुंबईफसवणूक करणार्‍या बिल्डरला महारेराचा चाप

फसवणूक करणार्‍या बिल्डरला महारेराचा चाप

Subscribe

१८ लाख रुपये ग्राहकाला परत देण्याचे आदेश

ग्राहकाने घराची बुकींग रद्द केल्यानंतर पैसे परत देण्यास चालढकल करणार्‍या बिल्डरला रेराने जोरदार दणका दिला आहे. या ग्राहकाने संबंधित बिल्डरकडे २०१४ मध्ये घराची बुकींग केली होती. त्यापोटी बिल्डरला १८ लाख रुपये दिले होते. ही सर्व रक्कम आता व्याजासह परत करण्याचे आदेश महारेराने बिल्डरला दिले आहेत. या निर्णयामुळे ग्राहकांची फसवणूक करणार्‍या बिल्डरांचे दाबे दणाणले आहेत.

ठाणे येथील श्रीनगर परिसरात राहणार्‍या गुप्ते कुटुंबाने निर्माण डेव्हलपर्स या बिल्डरकडे २०१४ मध्ये फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी गुप्ते कुटुंबियांनी बिल्डरला सुमारे १८ लाख रुपये दिले होते. मात्र, आचानक त्यांच्या घरात आर्थिक अडचण निर्माण झाल्याने त्यांनी २०१७ मध्ये आपली बुकींग रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसे त्यांनी बिल्डरला पत्राद्वारे कळविले. बिल्डरनेही गुप्ते यांची बुकींग रद्द केली आणि त्यांना १८ लाख रुपयांचा धनादेश दिला. मात्र, हा धनादेश तुम्ही बँकेत टाकू नका, आम्ही तुमची रक्कम आरटीजीएस किंवा एनईएफटीच्या माध्यमातून पाठवितो, असे आश्वासन बिल्डरने त्यांना दिले.

- Advertisement -

त्यामुळे त्यांनी बँकेत धनादेश टाकला नाही. त्यानंतर बिल्डरने १८ लाख रुपये देण्यास चालढकल चालवली. शेवटी आपली अडकलेली रक्कम मिळविण्यासाठी गुप्ते यांनी रेराकडे धाव घेतली. अ‍ॅड. अमिता चवरे यांनी त्यांची बाजू भक्कमपणे मांडली. मात्र, बुकींग रद्द झालेली असल्याने रेराने हात वर केले आणि तक्रारदाराच्या विरोधात निकाल दिला. त्यानंतर या प्रकरणी महारेराकडे अपील करण्यात आले. या अपीलावर सुनावणीदरम्यान, महारेराने बिल्डरला १८ लाख रुपये गुप्ते यांना परत करण्याचे आदेश बिल्डरला दिले.

छळवणूक करणार्‍या बिल्डरांना चपराक
घराचे बुकींग केल्यानंतर मुदतीत घराचा ताबा अनेक बिल्डरांकडून दिला जात नाही. मुदत संपल्यानंतरही ग्राहकांना तीन ते चार वर्षे वाट पहावी लागते. बुकींग रद्द केल्यानंतर अनेक बिल्डर ग्राहकांचे पैसे परत करताना आढेवेढे घेतात. मात्र, महारेराच्या या निर्णयामुळे बिल्डरांच्या या छळवणुकीला आता चपराक बसणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -