घरमुंबईमुंबई-पुणेकरांचे हाल संपेनात, पुन्हा रेल्वे झाल्या रद्द!

मुंबई-पुणेकरांचे हाल संपेनात, पुन्हा रेल्वे झाल्या रद्द!

Subscribe

मुसळधार पावसामुळे आधीच हाल सुरू असलेल्या पुणे आणि मुंबईकरांना या मार्गावरच्या ४ महत्त्वाच्या गाड्या रद्द झाल्यामुळे अधिकच मनस्ताप सहन करावा लागणार आहे. येत्या ४ दिवसांसाठी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत.

तब्बल आठवड्याभरापासून मुंबई, पुणे, लोणावळा, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि आसपासच्या भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका या भागात राहणाऱ्या सामान्य नागरिकांना होत आहे. त्यातच पावसामुळे मुंबईहून सुटणाऱ्या आणि मुंबईत येणाऱ्या अनेक एक्स्प्रेस आणि मेल रद्द झाल्यामुळे या मनस्तापात अधिकच भर पडली. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरचं मेल आणि एक्स्प्रेसचं वेळापत्रक गेल्या काही दिवसांपासून याच पावसामुळे विस्कळीत झालेलं असतानाच आता मुंबईकर आणि पुणेकर नेहमी ज्या गाड्यांनी प्रवास करतात, त्या गाड्या थेट रद्दच करण्यात आल्या आहेत. ८ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट २०१९ या कालावधीमध्ये या गाड्या रद्द असतील, असं रेल्वेकडून जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबई आणि पुणेकरांना याचा फटका बसणार आहे.

कोणत्या गाड्या झाल्या रद्द?

  • पुणे-मुंबई(१२१२३) आणि मुंबई-पुणे(१२१२४) डेक्कन क्वीन
  • पुणे-मुंबई(११००९) आणि मुंबई-पुणे(११०१०) सिंहगड एक्स्प्रेस
  • पुणे-मुंबई(२२१०५) आणि मुंबई-पुणे(२२१०६) इंद्रायणी एक्स्प्रेस
  • पुणे-मुंबई(१२१२७) आणि मुंबई-पुणे(१२१२८) इंटरसिटी एक्स्प्रेस

हेही वाचा – राज्यातील पूरस्थितीमुळे मुंबईकरांवर संकट; आवक घटल्याने दूध, भाज्या महाग

एकीकडे रेल्वे मार्गावरची वाहतूक पावसामुळे विस्कळीत झालेली असताना रस्ते मार्गांवर देखील अशाच प्रकारे दरड कोसळणे किंवा रस्ता खचणे या कारणांमुळे अनेकदा वाहतूक बंद तरी होते किंवा संथ तरी होते. त्यामुळे पुणे आणि मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर ये-जा करणाऱ्या नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -