घरमहाराष्ट्रराधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले

राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे उघडले

Subscribe

राधानगरी धरणातून सुमारे १८००० क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

आठवड्याभरापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातील गावांची स्थिती भयावह झाली आहे. सोमवारपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे महापूराचा विळखा कोल्हापूरसह सांगलीला बसला आहे. ज्यावेळी पावसाचा जोर कमी होतो त्यावेळी या धरणाचे दरवाजे बंद होतात.

कोल्हापुरातील पूर परिस्थिती गंभीर शक्यता

पाऊस ओसरल्याने राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे बंद होते. त्यामुळे कोल्हापुरातील पुराचे पाणी ओसरेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण, आताच राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजे खुले करण्यात आले आहे. त्यामुळे भोगावती नदीपात्रात १८००० क्युसेस प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे. त्यामुळे धरणक्षेत्रात सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे कोल्हापुरातील पूर परिस्थिती गंभीर शक्यता आहे.

- Advertisement -

नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

पुन्हा पावसाने संततधार सुरु केल्याने धरणाचे सात स्वयंचलीत दरवाजे खुले झाले आहेत. याकरिता खबरदारी म्हणून तीन आपतकालीन दरवाजेही दोन-अडीच फुटांनी उचलले आहेत. त्यामुळे राधानगरी धरणातून सुमारे १८००० क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग होत असून नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोल्हापूर मधील पूरस्थितीमुळे दोन दिवसापासून वीजपुरवठा खंडीत झाला आहे. दुरध्वनी, मोबाईलची संपर्कसेवा देखील बंद झाल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -