घरमुंबईमालाड दुर्घटना : मुख्यमंत्र्यांची मदत पोहोचणार कधी? स्थानिक हवालदील!

मालाड दुर्घटना : मुख्यमंत्र्यांची मदत पोहोचणार कधी? स्थानिक हवालदील!

Subscribe

मालाडमधील दुर्घटनाग्रस्तांना मदतीच्या घोषणा सरकारी पातळीवर झाल्या असल्या, तरी प्रत्यक्ष वास्तव मात्र वेगळं असल्याचं चित्र दिसून येत आहे.

मालाडच्या आंबेडकर नगरमध्ये संरक्षक भिंत कोसळून २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू ओढवला. या घटनेला नक्की कोण जबाबदार आहे? याची शहानिशा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्याच्या सविस्तर चौकशीचे आदेश देखील दिले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना राज्य सरकारने, एनडीआरएफने आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी आर्थिक मदत देखील जाहीर केली आहे. ‘जे बेघर झाले, त्यांना देखील मदत मिळेल’, असं आश्वासन स्वत: मुख्यमंत्र्यांनी भर विधानसभेत दिलं. पण कुरार व्हिलेजमधल्या या ठिकाणी मात्र परिस्थिती काहीशी वेगळी असल्याचं पाहायला मिळत आहे. इथल्या स्थानिकांशी बोलल्यावर ‘ग्राऊंड रिअॅलिटी’ची सहज कल्पना यावी!


हे तुम्ही वाचलंत का? – …तर मालाड दुर्घटना टळली असती

‘आम्हालाच मदतकार्य करावं लागतंय!’

आंबेडकरनगरमध्ये भिंत कोसळल्यामुळे अनेक झोपड्या पाण्याखाली गेल्या. पण या घटनेला जवळपास दोन दिवस उलटूनही या ठिकाणी आवश्यक तेवढी मदत पोलीस प्रशासन, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाकडून मिळाली नसल्याची खंत इथले रहिवासी व्यक्त करत आहेत. ‘आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून‌ इथे राहात आहोत. पण, फक्त मतदानाच्या वेळी लोक आमच्या इथे येतात. घटना घडल्यानंतर आमचीच लोकं इथे मदतकार्य करत आहेत. आम्ही अनधिकृतपणे राहतो असं सगळ्यांचं म्हणणं आहे. पण आधीची भिंत पडल्यानंतर नवीन भिंत दोन वर्षांपूर्वी बांधली आहे. इथे राहणाऱ्या प्रत्येकाचं खूप नुकसान‌ झालं आहे’, असं गाऱ्हाणं इथल्या आश्विनी मोहिते या स्थानिक रहिवासींनी ‘माय महानगर’च्या टीमकडे मांडलं.

- Advertisement -

‘खायचं काय? राहायचं कुठे?’

खुद्द मुख्यमंत्र्यांनी जरी आर्थिक मदत जाहीर केली असली, तरी त्यांच्यापर्यंत ही मदत अद्याप पोहोचलीच नसल्याचं या स्थिनिकांचं म्हणणं आहे. एवढी मोठी दुर्घटना घडल्यानंतर सरकारने कुठल्याच प्रकारची मदत आमच्यापर्यंत पोहोचवली नाही. त्यामुळे आता तरी सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे. लवकरात लवकर मदत द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. इथल्या रहिवाशांना राहायला घर नाही किंवा अंगावर घालायला कपडे नाहीत. जेवण बनवायला भांडी नाहीत. त्यामुळे काय खायचं? कुठे राहायचं? असा प्रश्न इथल्या रहिवाशांना पडला आहे.


पाहा हा व्हिडिओ – मालाडच्या आंबेडकरनगरकडे सरकारचं दुर्लक्ष
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -