घरमुंबई… आणि ते ढिगाऱ्याखाली दिवसभर शोधत राहिले

… आणि ते ढिगाऱ्याखाली दिवसभर शोधत राहिले

Subscribe

रामदासचे कुटुंब बचावले मात्र २२ वर्षाची मेव्हुणी अद्यापही बेपत्ता

सोमवारी रात्री बाराच्या सुमारास अचानक काहीतरी कोसळण्याचा आवाज आला आणि आम्ही सर्व कुटुंब घराबाहेर आलो, बाहेर मुसळधार पाऊस सुरु होता. दगड मातीच्या ढिगाऱ्यातून ओरडण्याचा रडण्याचा आवाज येत होता, मात्र काळोखात काही कळत नव्हते काय झालं ते. आम्ही जवळ जाऊन बघितले तर काय दगडाची संरक्षण भिंत घरावर कोसळली होती. त्यात अनेक जण गाडले गेले होते. लक्ष्मीबाई नगर, आंबेडकर नगर मधील रहिवाशी मदतीसाठी धावून आले आणि आम्ही सर्वानी दगड मातीच्या ढिगाऱ्यातून काही जणांना बाहेर काढून मिळेल त्या हॉस्पिटलमध्ये पोहचवण्याचे काम करीत होतो,’ असे या दुर्घटनेतून बचावलेले रामदास पवार सांगत होते.

माझे कुटुंब तर वाचले मात्र माझ्या सासरवाडीचे पाच जण यामध्ये जखमी झाले असून २२ वर्षाची माझी मेहुणी अद्यापही मिळून आलेली नसल्याचे पवार सांगत होते.

- Advertisement -

सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडलेल्या दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी दिवसभर ते ढिगाऱ्यात काही तरी शोधत होते, त्यांना याबाबत विचारले असता अहो माझी मेहुणी अजून मिळून आलेली नाही तिचाच शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या दुर्घटनेबाबत त्याना विचारले असता आम्ही सर्व कुटुंब झोपण्याच्या तयारीत असताना रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळण्याचा आवाज झाला, बाहेर येऊन बघतले तर संपूर्ण भिंत झोपड्यावर पडली होती, दगड मातीचा चिखलाखाली अनेकजण घडले गेले होते. आंबेडकर नगर, लक्ष्मी नगर येथील रहिवाशी चिखलाखालून एकेकाला बाहेर काढून मिळेल त्या हॉस्पिटलला जखमींना पोहचवत होते. रात्री २ वाजण्याच्या सुमारास दुर्घटनास्थळी दाखल झालेल्या आपत्कालीन पथकाने बचावकार्य सुरु केले अशी माहिती स्थनिक रामदास पवार यांनी आपलं महानगरला दिली.

रामदास पवार हे आई पत्नी आणि दोन मुलासह मालाड कुरार व्हिलेज येथील आप्पा पाडा, आंबेडकर नगर येथे गेल्या २० वर्षांपासून वास्तव्यास आहे. ते छोटी मोठी नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांची सासुरवाडी देखील याच ठिकाणी काही अंतरावर असलेल्या लक्ष्मी नगर येथे आहे. सुनील सकपाळ, अलका सकपाळ अशी त्यांच्या सासू सासऱ्याची नावे. सकपाळ कुटुंबात सहा जण राहण्यास असून दोन मुले आणि दोन मुली आहेत. मालाड पिपरी पाडा येथील जलाशयाची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या या दुर्घटनेत सकपाळ कुटुंब जखमी झाले असून त्याची २२ वर्षाची मुलगी सोनाली अद्याप मिळून आलेली नाही. आपत्कालिन पथकाने तिचा दिवसभर शोध घेऊनही तिचा काही थांगपत्ता अद्याप लागलेला नसल्याचे पवार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -