घरमुंबईदमदार पावसाचा मुंबईकरांना दिलासा; धरणसाठा ११ टक्क्यांवर

दमदार पावसाचा मुंबईकरांना दिलासा; धरणसाठा ११ टक्क्यांवर

Subscribe

मॉन्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईमध्ये दमदार हजेरी लावल्याने अवघ्या तीन दिवसांत मुंबईतील पाणीसाठा ११ टक्क्यांवर पोहोचला आहे. वर्षाच्या एकूण १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर्सच्या तुलनेत १ लाख ६९ हजार दशलक्ष लिटर्स पाणी साठा सर्व धरणामध्ये जमा झाला आहे.

मुंबई वेधशाळेच्या सांताक्रूज केंद्रात १ जूनपासून आजपर्यंत १०१६ मिमी. पावसाची, तर कुलाबा केंद्रात या कालावधीत ६२३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पावसाने जोर दाखविला असला तरी धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्या अपेक्षित वाढ होण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

- Advertisement -

मुंबई शहराला वर्षाकाठी एकूण 14 दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची गरज भासते. शहराला धरणांमधून पाणी पुरवठा केला जातो. मोडकसागर, तानसा, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या धरणांची मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाची भूमिका आहे. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने हा धरणसाठा अपेक्षित भरला नव्हता. मार्च महिन्यात पालिकेने जाहीर केल्यानुसार 22 मार्चपर्यंत एकूण 4,54,222 दशलक्ष लिटर एवढा जलसाठा शिल्लक होता. त्यामुळे अतिरिक्त जलसाठ्याचा वापर करावा लागणार होता. मात्र आता या धरणसाठ्यात ११ टक्क्यांनी वाढ झाली असून काही प्रमाणात मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -