घरमुंबईसैनिकाचे ओळखपत्र वापरुन लोकांना फसवले

सैनिकाचे ओळखपत्र वापरुन लोकांना फसवले

Subscribe

ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी सैनिकाच्या ओळखपत्र वापरुन लोकांना लुबाडल्याचे समोर आले आहे.

भारतात ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याची झळ बड्या पोलीस अधिकाऱ्यापाठोपाठ देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना देखील बसत आहे. ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी सैनिकाच्या ओळखपत्राचा वापर करुन सामन्याची फसवणूक करीत असून याचा नाहक त्रास सैनिकांना सोसावा लागत आहे. अणुशक्ती केंद्र या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या एका सीआयएसएफच्या जवानांचे ओळखपत्राचा वापर करुन सायबर गुन्हेगाराने अनेकांची फसवणूक केली असून या ओळखपत्रामुळे मात्र जवानांना पोलिसांना तोंड द्यावे लागत असल्याचे एका प्रकणातून उघडकीस आले आहे.

अशी केली सैनिकाची फसवणूक

रतनसिंग धनकर असे या जवानांचे नाव आहे. अणुशक्ती नगर येथे राहणारे रतनसिंग हे सीआयएसएफचे जावं असून सध्या त्यांची ड्युटी भाभा अणुशक्ती केंद्र या ठिकाणी आहे. काही आठवड्यापूर्वी रतनसिंग यांना ऑनलाईन वेबसाइड बाजारात एक मोटार स्वस्त दरात विक्री होत असल्याचे लक्षत येताच त्यानी मोटारीच्या मालकाला फोन केला. समोरच्या व्यक्तीने स्वतःला आर्मीमध्ये असल्याचे सांगून मोटारीसाठी १० हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करावा लागेल असे सांगितले. मोटार बघण्यापूर्वी आगाऊ रक्कम मागत असल्यामुळे रतनसिंग यांनी त्याकडे दुर्लक्ष केले परंतु रतनसिंग यांच्या व्हॉटअँप्स वर मोटार मालकाने ते स्वतः सैनिक असल्याचे सांगून स्वतःचे ओळखपत्र पाठवले. त्यांनंतर रतनसिंग यांच्याकडे त्यांच्या ओळखपत्राच्या फोटोची मागणी केली. रतनसिंग यांना खरोखर विश्वास बसताच त्यांनी स्वतःचे ओळखपत्राचे फोटो पाठवले.

- Advertisement -

सैनिकाला नाहक त्रास

दरम्यान, रतनसिंग यांच्या ओळखपत्राचा दुरुपयोग करुन ओळखपत्रे सामान्य नागरिकांना पाठवून वस्तू विकत असल्याचे नावाखाली अनेकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेल्या इसमांनी या ओळखपत्रातील व्यक्तिने आमची फसवणूक केल्या असल्याच्या अनेक तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल केल्या आहेत. या तक्रारीवरून रतनसिंग यांच्या वरिष्ठांनी त्यांच्याकडे याबाबत चौकशी केली असता हा प्रकार रतनसिंग यांच्या लक्षात आला. आपली नाहक बदनामी होत असून आपल्या नावावर गुन्हे दाखल होत असल्याचे लक्षात येताच रतनसिंग यांनी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी रतनसिंग यांची तक्रार दाखल करून अज्ञात सायबर गुन्हेगारावर गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकारचे गुन्हे मुंबईतील अनेक पोलीस ठाण्यात दाखल झाले असून सैनिकांच्या ओळखपत्राचा सर्रासरित्या वापर करुन त्यामार्फत सामांन्यांची फसवणूक करण्याचा नवीन फंडा सायबर गुन्हेगांरानी शोधून काढला आहे. या प्रकारामुळे सैनिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून देशासाठी हे तेवढेच धोकादायक ठरु शकते. सायबर गुन्हेगारांकडून सैनिकाच्या ओळखपत्राचा वापर देशाची सुरक्षा भेदण्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -