घरCORONA UPDATEवांद्रे जमावाप्रकरणी विनय दुबेला अटक; त्या १००० जणांविरोधातही गुन्हा दाखल

वांद्रे जमावाप्रकरणी विनय दुबेला अटक; त्या १००० जणांविरोधातही गुन्हा दाखल

Subscribe

वांद्रे परिसरात अचानक झालेल्या हजारोंच्या जमावाप्रकरणी पोलिसांनी त्या १००० विरोधात गुन्हा दाखल केला असून विनय दुबेला अटक केली आहे.

वांद्रे स्टेशन परिसरात काल अचानक हजारोंच्या संख्येने जमा झालेल्या मजुरांमुळे मुंबईत एक खळबळ उडाली. याप्रकरणी आता पोलिसांनी कडक पावल उचलतं त्या १००० मजुरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष असलेल्या विनय दुबेलाही पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांनी काल रात्री ऐरोली येथून विनय दुबेला अटक केली. त्यानंतर रात्री उशीरा त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आज त्याला कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. विनय दुबे यांनी व्हिडिओ शेअर करून लोकांना गोळा करण्याचे आवाहन केले होते.

- Advertisement -

काय आहे प्रकरण 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात आणखी १९ दिवसांचा लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल जाहीर केला. त्यानंतर दुपारी ४ च्या सुमारात हजारोंच्या संख्ये उत्तर भारतीय मजूर वांद्रे स्थानक परिसरात एकत्र जमले. आम्हाला काम नाही, त्यामुळे पैसा नाही. आम्हाला आमच्या गावी जायचे आहे, अशी मागणी या जमावाने केली. दरम्यान, पोलीस आणि स्थानिक आमदार झिशान सिद्धिकी यांनी जमावाची समजूत काढली. कोणीही उपाशी राहणार नाही, असे आश्वस्त केले. वेळप्रसंगी गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्जही केला. अखेर काही तासांनी ही गर्दी ओसरली. मात्र एकाचवेळी इतक्या मोठ्या संख्येने हे मजूर इथे आले कसे, हा प्रश्न उपस्थित झाला. याचे कारण म्हणजे उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष विनय दुबे यांनी काल सकाळी एक व्हिडिओ जारी करून याबाबतचे आवाहन मजुरांना केले होते. त्यांनी व्हिडिओत म्हटले होते की, राज्यात राहणाऱ्या मजुरांना काम नसल्यामुळे त्यांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. तेव्हा सरकारने रेल्वे सुरू करून या सर्वांना त्यांच्या त्यांच्या गावी जाण्यासाठीचा मार्ग मोकळा करून द्यावा. अन्यथा आम्ही सर्व एकत्र जमून पायी आमच्या गावी उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी निघू, अशी धमकी दुबे यांनी सरकारला दिली होती. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढल्याची घोषणा केली आणि दुपारी हजारो मजुरांनी एकत्र येत कोरोनाचा धोका असतानाही सोशल डिस्टन्सिंगची ऐशी तैशी केली.

हाच तो व्हिडिओ –

???? #सरकार को #आखरी_चेतावनी !!!????✅ यह #विडियो महाराष्ट्र मे #फंसे हर इंसान तक #पहुचाएँ जो #अपने_गाव_घर_परिवार मे #वापस जाना #चाहता है !!???????????? #विनय_दुबे ????????????

Vinay Dubey ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 11, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -