घरCORONA UPDATECorona Live Update: मुंबईत २४ तासांत १८३ नवे कोरोना रुग्ण, २ जणांचा...

Corona Live Update: मुंबईत २४ तासांत १८३ नवे कोरोना रुग्ण, २ जणांचा मृत्यू

Subscribe
ठाण्यात १७ नवीन रूग्ण आढळले 
ठाणे जिल्हयात गेल्या २४ तासात करोनाचे १७ नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यात एकटया ठाण्यातील १४ नवीन रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्हयात करोनाबाधितांची संख्या २६६ वर पोहोचली आहे. आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईत २४ तासांत १८३ नवे कोरोना रुग्ण, २ जणांचा मृत्यू. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात १७ जणांचा डिस्चार्ज देण्यात आला. नव्या आकडेवारीनुसार मुंबईतल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १९३६ तर त्यात ११३ मृत्यू!

bmc letter

- Advertisement -

 

भाटीया हॉस्पिटलच्या आणखी दहा कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

- Advertisement -

भाटीया हॉस्पिटलमधील आणखी 10 कर्मचाऱ्यांना कोरोनााची लागण झाल्याचे बुधवारी उघडकीस आले. त्यामुळे भाटीया रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 35 वर पोहोचली आहे. भाटिया हॉस्पिटलमध्ये तीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर 9 एप्रिलला भाटिया हॉस्पिटल बंद करण्यात आले. हॉस्पिटलमधील 150 कर्मचाऱ्यांची तपासणी केली असता त्यातील काही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले. यामध्ये परिचारिका व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह सापडणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये वाढ होत असून बुधवारी पुन्हा 10 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालातून उघडकीस आले. त्यामुळे भाटिया हॉस्पिटलमधील कोरोनाबाधितांचा आकडा 35 वर पोहचला आहे. 35 कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


बेस्टमधील कोरोना पॉझिटीव्ह कर्मचाऱ्याचा अखेर मृत्यू
मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या बेस्ट उपक्रमातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर मृत्यू झाला आहे. बेस्ट उपक्रमातील कर्मचाऱ्यांमध्ये झालेला हा पहिला मृत्यू आहे. मंगळवारी रात्री उशिरा या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाकडून देण्यात आली आहे. डायबेटिक, किडनी तसेच ह्दय विकाराच्या आजाराने हा कर्मचारी ग्रस्त होता. बेस्ट उपक्रमातील कोरोनाची लागण झालेला कर्मचारी हा विद्युत पुरवठा विभागात कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह असल्याने कर्मचाऱ्याच्या घरातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्यात आले होते. काही दिवस होम क्वारंटाईन केल्यानंतर या कुटंबीयांची चाचणी कोरोना निगेटीव्ह आली.

२० तारखेपासून केंद्र सरकारने काही नवे निर्देश जारी केले आहेत. यामध्ये काही विशिष्ट उद्योगांना काम करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, त्यांना मास्क लावणे, अंतर ठेवणे अशा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावंच लागेल. त्याशिवाय, देशात ज्या ठिकाणी हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोन नसतील, अशा ठिकाणी येत्या २० एप्रिलपासून काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. त्यामध्ये,

१) ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी मनरेगामध्ये काम करायचंय, त्यांना सूट असेल, पण सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. मनरेगामध्ये सिंचनाच्या कामांना प्राधान्य दिलं जाईल

२) शेती क्षेत्रातील संबंधित कामं सुरू राहतील

३) पशुपालनाच्या क्षेत्रातल्या कामांना परवानगी असेल

४) ग्रामीण भागात जे उद्योग असतील, तिथे काम सुरू करता येईल. विशेषत: अन्न प्रक्रिया उद्योग

५) आरोग्य विभागाशी संबंधित कामं सुरूच राहतील

६) जीवनावश्यक वस्तू-सेवांची कामं सुरू राहतील – किराणा इ.


देशात आत्तापर्यंत १७० जिल्हे हॉटस्पॉट श्रेणीत येतात, तर २०७ जिल्हे नॉन हॉटस्पॉट पण काही प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळलेत अशा श्रेणीमध्ये आहेत.


महाराष्ट्रात मागच्या १२ तासात ११७ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्याचा एकूण आकडा आता २८०१ वर पोहोचला आहे. मुंबईत ६६ तर पुण्यात ४४ रुग्ण वाढले आहेत.

 


नायर रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेची आत्महत्या

मुंबईतील नायर रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या एका २९ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे. आज पहाटे तिने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. कोरोनाबाधित रुग्णांना शोधून बरे करण्यासाठी प्रशासन अथक प्रयत्न करत असताना नैराश्य आणि कोरोनाच्या भीतीपोटी नायर हॉस्पिटलमधील एका रुग्ण महिलेने बुधवारी आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले. वरळीतील जिजामाता नगरमध्ये राहणाऱ्या महिलेने पहाटे चारच्या सुमारास बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.


यंदा चांगला पाऊस येणार

यंदा मान्सून चांगला होणार आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात पाऊस चांगला होणार असल्याने शेतकऱ्यांना यावेळी पेरणी वेळेत करता येणार आहे. ५ जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असे हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.


ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याला कोरोनाची लागण झाल्याने त्यांना उपचाराकरता रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वीच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ताफ्यातील पाच सुरक्षा रक्षक आणि आचारी कर्मचारी अशा १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली असतान ही घटना समोर आली आहे. सध्या आव्हाड हे होम क्वॉरंटाइन आहेत.


स्वतःला महासत्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेने कोरोना विषाणूसमोर अक्षरशः गुडघे टेकले आहेत. मागच्या २४ तासांत अमेरिकेत कोरोनामुळे २,२२८ लोकांचा मृत्यू झाला आहे. एएफपी वृत्त संस्थेने ही माहिती दिली आहे.

 


नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने मालेगावमध्ये कर्फ्यू जाहीर केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -