घरमुंबईतीन भावांनी केला हल्ला, दोन आरोपी अल्पवयीन

तीन भावांनी केला हल्ला, दोन आरोपी अल्पवयीन

Subscribe

बाबू नाडर हल्ला प्रकरण

कोपरी पूर्व परिसरात मटकाकिंग बाबू नाडरवर जीवघेणा हल्ला हरेश तेलुरे यांनी आपल्या दोन भावांच्या सहाय्याने शनिवारी रात्री केला. बाबू नाडर याच्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली होती. आरोपी हरेश तेलुरे आणि याचे दोन भाऊ सनी आणि बॉबी पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच त्यांना अटक केली. या तिघा आरोपींमध्ये दोन आरोपी हे अल्पवयीन असून हरेश तेलुरे (28) हा एकच आरोपी सज्ञान असल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

कोपरी परिसरात मटका, क्लब चालवणारा म्हणून बाबू नाडर याचे नाव आहे. पूर्व वैमनस्येतून या तिघा भावांनी भर रस्त्यात हत्यारांनी त्याच्यावर हल्ला केला. हरेशचा बाबू नाडर सोबत वाद सुरू होता. त्यामुळे हा हल्ला झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिली.

- Advertisement -

हल्लेखोरांपैकी सज्ञान असलेला आरोपी हरेश याच्याशी नाडरचे वैर होते. हल्ल्यानंतर नाडर हा ठाण्याच्या खाजगी ज्युपिटर रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याची प्रकृती सुधारत आहे. नाडरवरही अनेक गुन्हे दाखल आहेत. तर हरेशवरही गुन्हे दाखल आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -