घरमुंबईमातंग समाजाचा मुंबईत राज्यव्यापी मेळावा

मातंग समाजाचा मुंबईत राज्यव्यापी मेळावा

Subscribe

मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी येत्या २८ नोव्हेंबर रोजी मुंबईत राज्यव्यापी मेळावा घेण्यात येणार आहे.

मागासवर्गीय आणि सामाजिक दृष्ट्या नेहमीच उपेक्षित राहिलेल्या मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुंबई येथे राज्यव्यापी महामेळावा बुधवार २८ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे हे अध्यक्षपदी उपस्थित राहणार असून राज्यभरातील मातंग समाजाचे एकजुटीचे दर्शन घडणार असल्याची माहिती महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे पक्षप्रमुख आणि मेळाव्याचे आयोजक धनराज थोरात यांनी दिली आहे. तसेच या मेळाव्यात भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आदी मान्यवर या मेळाव्याला संबोधित करणार आहेत.

या मागण्यांसाठी घेण्यात येणार मेळावा

विदर्भ, मराठवाडा, कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रात मातंग समाजाची लोकसंख्या १ कोटीच्या जवळपास आहे. मात्र तरीही मातंग समाज आजही दुर्लक्षित राहिला आहे.१३ टक्के अनुसूचित जातीला (SC) अरक्षणामधून अ, ब, क, ड, वर्गीकरण करणे, भूमिहीन मातंग समाज, गायराण अतिक्रमण धारकांच्या प्रश्न, मातंग समाजाचे धर्म परिवर्तन रोखणे, अण्णाभाऊ साठे महामंडळातर्फे मातंग समाजाला तरतूद करणे, बेरोजगार युवकांना व्यवसायासाठी उद्युक्त करणे, कल्याण शिरढोण येथील आरक्षित जागेवर समाजातील भूमिहीन नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरे मंजूर करण्यात यावी, अशा अनेक मागण्या आणि या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आगामी काळात मातंग समाजाचा सामाजिक वराजकीय विकास करण्यासाठी आणि एका झेंड्याखाली आपला आवाज बुलंद करण्यासाठी हा राज्यव्यापी मेळावा पार पडणार असल्याचेही धनराज थोरात यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -