घरमुंबईके.ई.एम. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांसाठी आयसोलेशन पॅनेल

के.ई.एम. रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणांसाठी आयसोलेशन पॅनेल

Subscribe

केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ईसीजी मशिन्समध्ये शॉर्टसर्किट होऊन गंभीर जखमी झालेल्या प्रिन्स या चार महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाला होता. सदोष उपकरणामुळे ही दुघर्टना झाल्याचा आरोप यावेळी सर्वच स्तरातून करण्यात येत होता. त्यामुळे केईएमसह महापालिकेच्या सर्वच रुग्णालयातील वैद्यकीय उपकरणे आणि विद्युत साधनांच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय उपकरणांमध्ये बिघाड होऊन दुर्घटना घडू नये, यासाठी के.ई.एम. रुग्णालयाच्या विविध विभागात वैद्यकीय पृथक्करण पॅनेल (मेडिकल आयसोलेशन पॅनेल) बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुर्घटना टाळण्यासाठी पॅनेल

के.ई.एम. रूग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी वापरण्यात येणार्‍या वैद्यकीय सामुग्रीमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही असा दावा करणार्‍या महापालिकेने आता नव्या कंपनीची नवी सामग्री मागवली आहे. रूग्णालयाच्या विविध विभागात भारतीय तसेच परदेशी बनावटीची महागडी वैद्यकीय यंत्रे बसवण्यात आली आहेत. ही उपकरणे कार्यान्वित असताना विद्युत प्रवाहाचा दाब कमी जास्त होणे, एखादी फेज बंद होणे आदी बिघाड होत असतात. त्यामुळे अनेकदा रूग्णालयाची वैद्यकीय सेवा खंडित होते आणि दुर्घटनाही घडतात. हे प्रकार टाळण्यासाठी वैद्यकीय पृथक्करण पॅनेल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

- Advertisement -

तीन वर्षे देखभालीचं कंत्राट

या कामासाठी मे. ओम टेक्निकल सोल्युशन्स या कंपनीला ३ कोटी २८ लाख रूपयांचे कंत्राट देण्यात येणार आहे. एक वर्षाचा मोफत हमी कालावधी आणि त्यानंतर तीन वर्ष देखभालीचे काम याच कंपनीकडे असेल. पॅनेल उभारण्यास विलंब झाल्यास कंत्राट किंमतीच्या एक टक्के दंड ठोठावला जाईल. या कंत्राटानुसार कंपनीला मशिनची तीन वर्षे देखभाल करावी लागणार असून त्यात कंत्राटदार अयशस्वी ठरल्यास तासानुसार दंड आकारला जाईल.


वाचा सविस्तर – केईएम पुन्हा वादात; नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -