घरमुंबईकेईएम पुन्हा वादात; नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

केईएम पुन्हा वादात; नऊ वर्षाच्या मुलाचा मृत्यू

Subscribe

केईएम रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका नऊ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये पुन्हा एकदा संतापजनक प्रकार घडला आहे. काही दिवसांपूर्वीच केईएम हॉस्पिटलमधील मांजरीने मानवी भ्रूण खाल्ल्याचा प्रकार घडला होता. तर त्याआधी देखील दोन महिन्याच्या प्रिन्सचा केईएममधील सदोष मशिनमुळे मृत्यू ओढवल्याची घटना ताजी घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा केईएम रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. केईएम रुग्णालयात एका नऊ वर्षाच्या मुलाचा डॉक्टरांनी चुकीचे औषध दिल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.

नेमके काय घडले?

केईएम रुग्णालयात दाखल झालेल्या एका नऊ वर्षाच्या मुलाला दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्या मुलाला घरी जताना लागणारी औषधे देण्यात आली होती. त्या औषधांमध्ये एक गोळी मोठ्या आकाराची होती. ती गरम दुधातून घेण्याचा सल्ला देखील देण्यात आला होता. तरीही गोळी घशात अडकून मुलाला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणताना त्याचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले आहे. चुकीच्या औषधामुळे मृत्यू झाल्याचा आरोप मुलांच्या पालकांनी केला आहे. याबाबत पालकांनी तक्रार अर्ज दिल्याचे वरळी पोलिसांनी सांगितले आहे.

- Advertisement -

मुलाला मृतावस्थेत आणण्यात आले होते. या मुलाचे शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.  – डॉ. हेमंत देशमुख; केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता


हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात 2 लाख 60 हजार बेरोजगार नोकरीच्या प्रतिक्षेत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -