घरमुंबईमहाविकासआघाडीची चर्चा सकारात्मक, उद्याही चर्चा - पृथ्वीराज चव्हाण

महाविकासआघाडीची चर्चा सकारात्मक, उद्याही चर्चा – पृथ्वीराज चव्हाण

Subscribe

‘शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची सरकार स्थापनाबाबत संयुक्त बैठक झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आणि उद्या पुन्हा चर्चा होणार आहे’, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मुंबईच्या नेहरु सेंटर येथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्रीपदासह सत्ता स्थापनेच्या दावा करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनी बोलणे टाळले

बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सर्वात अगोदर बैठकीतनू बाहेर आले. त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर सर्वसंमती दिली असल्याचे म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरे बैठकीतून बाहेर आले. मात्र, त्यांनी काहीच विशेष अशी प्रतिक्रिया दिली नाही. उद्या तिनही पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रीपदाबाबत माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्यावतीने पृथ्वीराज चव्हाण आणि जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्या दोघांशिवाय एकाही नेत्याने आजच्या बैठकीबाबत काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -