घरमुंबईआज वाट लागणार; मुंबईकरांनो, दिवस लवकर सुरू करा!

आज वाट लागणार; मुंबईकरांनो, दिवस लवकर सुरू करा!

Subscribe

मुंबई लोकल मेगाब्लॉक वेळापत्रक

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईत कोसळणाऱ्या पावसाचं कारण देत मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल असंख्य वेळा लेट झाली आहे. एरवी पाऊस, तो नसेल तर तांत्रिक बिघाड आणि तेही नसेल तर विनाकारण देखील मुंबईची लोकल उशिराने धावत होती. त्यात रविवारचा ब्लॉक खूप अपवादानेच मुंबईकरांना चुकला आहे. आज अर्थात २२ सप्टेंबर रोजी रेल्वेच्या तिनही मार्गांवर रेल्वेकडून ब्लॉक घेण्यात येणार असल्यामुळे मुंबईकरांचा सुपर सण्डे खरंतर सुपर ब्लॉक सण्डे होणार आहे. त्यामुळे जर कुठे जाण्याची तुमची तयारी असेल, तर तुमचा दिवस जरा लवकरच सुरू केलेला बरा! कारण आज तिनही मार्गांवरच्या ब्लॉकमुळे वाट लागणार आहे!

मध्य रेल्वे – मेन लाईन

- Advertisement -

मुलुंड ते माटुंगा – अप जलद मार्ग

वेळ – सकाळी ११.१५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

- Advertisement -

हार्बर मार्ग

कुर्ला ते वाशी – अप आणि डाऊन मार्ग

वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० वाजेपर्यंत

पश्चिम रेल्वे

मुंबई सेट्रल ते माटुंगा रोड – अप आणि डाऊन जलद

वेळ – सकाळी १०.३५ ते दुपारी २.३५ वाजेपर्यंत

रविवारचा रेल्वेब्लॉक तसा मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र, ज्या रविवारी तिनही मार्गांवर ब्लॉक असतो, तेव्हा मुंबईकरांचं वेळापत्रक पार कोलमडून जातं. त्यामुळे आज मुंबईत कुठेही जायचं असेल, तर घरातून किमान अर्धा तास लवकरच निघालेलं बरं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -