घरमुंबईशिवसेनेत प्रवेश करताच Milind Deora यांच्याकडून CM शिंदेंचं कौतुक; म्हणाले- सहज उपलब्ध...

शिवसेनेत प्रवेश करताच Milind Deora यांच्याकडून CM शिंदेंचं कौतुक; म्हणाले- सहज उपलब्ध होणारा नेता…

Subscribe

गेल्या दहा वर्षांत मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. मुंबईकरांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. पण या यशाचे कारण नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची धोरणे आहेत. माझ्या सुख-दु:खात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो असेही यावेळी मिलिंद देवरा म्हणाले. 

मुंबई : शिवसेना (शिंदे गट) प्रवेश करताच माजी खासदार मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा सहज उपलब्ध होणारा नेता मी आतापर्यंत कधीच पाहिला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महे जमिनीवरचे नेते आहेत. असेही यावेळी माजी खासदार मिलिंद देवरा म्हणाले. (Milind Deora praises CM Shinde as soon as he joins Shiv Sena Said Easily accessible leader)

पुढे बोलताना माजी खासदार मिलिंद देवरा म्हणाले की, मी आतापर्यंत कधीच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेला वर्षा बंगला इतका महाराष्ट्रातील जनतेसाठी Accessible असल्याचा कधीच पाहिला नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानू इच्छितो, मुंबईत आपण हे करू शकू याची कल्पनाही केली नव्हती, मला एक गोष्ट जोडावीशी वाटते. गेल्या दहा वर्षांत मुंबईवर एकही दहशतवादी हल्ला झालेला नाही. मुंबईकरांसाठी ही मोठी उपलब्धी आहे. पण या यशाचे कारण नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांची धोरणे आहेत. माझ्या सुख-दु:खात मला साथ दिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानू इच्छितो असेही यावेळी मिलिंद देवरा म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Congress : ‘कोणाच्या जाण्यानं काही फरक पडत नाही’; Milind Deora यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसची भूमिका

तुम्हा सर्वांना माहित आहे की, हा निर्णय घेणे सोपे नव्हते. पण जे आज इथे उपस्थित आहेत आणि जे आज आपल्या सोबत नाहीत त्यांना मी या व्यासपीठाच्या माध्यमातून सर्वांना विनंती करू इच्छितो की, सुवर्ण भविष्य घडवण्यासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा आणि मुंबई, महाराष्ट्र आणि भारताची अधिक चांगल्या प्रकारे सेवा करा असेही आवाहन यावेळी देवरा यांनी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांना केले. पुढे बोलताना मिलिंद देवरा म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, महाराष्ट्र आणि भारतातील सामान्य लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली या संधीबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि मी येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो की तुमच्या सोबत प्रामाणिकपणे पक्षाला वाढवण्यासाठी काम करत राहिन असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा : INDIA मध्ये सगळं काही आलबेल, मतभेद असल्याचे वृत्त Akhilesh Yadav यांनी फेटाळले

ट्वीट करत दिला काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार असलेले मिलिंद देवरा हे काँग्रेस पक्षातून बाहेर पडले असून त्यांनी स्वतः सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबतची माहिती दिली. आगामी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आल्यानंतर मिलिंद देवरा नाराज असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता त्यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे. मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती X या सोशल मीडियावरील त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -