घरमुंबईप्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

प्रजासत्ताक दिनी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

Subscribe

प्रजासत्ताक दिनी मंत्रालयाच्या समोर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला.

केंद्रीय आश्रमशाळा संचालकांनी आज प्रजासत्ताक दिनी मंत्रालयाच्या समोर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. वेळीच पोलिसांनी कारवाई केल्याने मोठा अनर्थ टळला. आश्रमशाळा संचालक रमेश सुल्ताने, केवल फडतरे, सोहम कुमार धार्मिक आणि किरण देसले या चौघांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर असलेल्या पोलिसांनी त्यांना अडविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

या कारणामुळे केला आत्महत्या करण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी आश्रम शाळांना अनुदान देण्याचे आश्वासन सहा महिन्यापूर्वी दिले होते. मात्र, मंत्रालयात हेलपाटे घालूनही काहीच हाती लागले नाही. शेवटचा पर्याय म्हणून आत्मदहन करत असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. याबाबतचे पत्र राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांना दिले होते. जळगाव येथील ना.धो. महानोर निवासी शाळेचे संस्थाचालक रमेश सुल्ताने यांच्यासह चार जणांनी हा प्रयत्न केला. आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या चारही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याअंतर्गत पुढील कारवाई करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -