घरमुंबईभाजप सरकारची फसवेगिरी पुन्हा उघड; मनसेने दिला पुरावा

भाजप सरकारची फसवेगिरी पुन्हा उघड; मनसेने दिला पुरावा

Subscribe

'ए लाव रे तो व्हिडिओ' म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला अडचणीत आणल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी 'आता बघाच तो व्हिडिओ' म्हणत राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाची मनसे स्टाईलमध्ये उत्तरं दिली. मात्र भाजपला पुन्हा एकदा मनसेने जशास तसे उत्तर दिले.

‘ए लाव रे तो व्हिडिओ’ म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपला अडचणीत आणल्यानंतर भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी ‘आता बघाच तो व्हिडिओ’ म्हणत राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाची मनसे स्टाईलमध्ये उत्तरं दिली. मात्र भाजपला पुन्हा एकदा मनसेने जशास तसे उत्तर दिले असून, चक्क पत्रकार परिषदेतमध्ये जाहिरातीत फोटो असलेल्या आणि प्रत्यक्ष योजनेचा लाभ न मिळालेल्या रेखा वाहटूळे यांना माध्यमांसमोर आणत सरकारच्या जाहिरातीची मनसेने चिरफाड केली. शनिवार, २७ एप्रिल रोजी सकाळी भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी वांद्रे येथील रंग शारदा येथे ‘बघाच तो व्हिडिओ’ करत राज यांनी केलेल्या आरोपांना उत्तर दिले. मात्र लागलीच मनसेने राजगड येथे पत्रकार परिषद घेत सरकारी जाहिरातीची आणखी एक पोलखोल करत भाजपावर टीका केली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी कौशल्य इंडियाच्या माध्यमातून सरकारने फसवणूक झालेल्या रेखा वाहटूळे यांना समोर आणत खोटी जाहिरात केल्याचा आरोप केला.

१९ मुद्यांपैकी १० चं मुद्दे मांडले 

दरम्यान, आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची कॉपी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलेच नसल्याचे संदीप देशपांडे यांनी यावेळी सांगितले. तसेच गाढवाने वाघाचे कातडे घातले तरी तो वाघ होत, नाही अशी टीका देखील देशपांडे यांनी यावेळी केली. तसेच आशिष शेलार यांनी १९ मुद्यावर उत्तर देऊ, असे सांगितले होते. पण त्यांनी १० मुद्दे मांडले, असे देखील देशपांडे यांनी सांगत आशिष शेलार यांच्यावर जोरदार टीका केली. आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांनी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यावर टीका करणारा जुना व्हिडिओ दाखवला. पण राज ठाकरे यांनी आधीच याबाबत सांगितले असून, भाजपाकडे मुद्दे उरले नसल्याचा आरोप देखील देशपांडे यांनी केला. एवढच नाही तर आम्ही प्रश्न विचारायचे नाहीत का? तुम्हाला अक्षय कुमार याचे प्रश्न आवडतात का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

कंबरे खालची टीका करून बघावी मग कळेल

मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला या भाजपाने दाखवलेल्या व्हिडिओवर देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांच्यावर कुणी कंबरेखालची टीका केली, तर त्याचे परिणाम असेच भोगावे लागतील. आशिष शेलार यांनी देखील एकदा अशी कंबरे खालची टीका करून बघावी मग कळेल, असा इशारा देखील देशपांडे यांनी दिला. १५ लाक यावर बोलताना देशपांडे म्हणाले की, १५ लाख आम्ही खात्यात देऊ, असे पंतप्रधान म्हणाले नाही, असे शेलार यांनी सांगितले. पण त्यांचेच नेते नितीन गडकरी हे म्हणाले की, १५ लाख गळ्यात अडकलेले हाड आहे. तसेच अमित शहा हेदेखील म्हणाले होते की, तो एक जुमला होता. त्याच्यांच नेत्यांकडून असे वक्तव्य कसे काय केले जाते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाने जे असंख्य व्हिडिओ बनवले तेच आता त्यांच्यावर उलटत असल्याची टीका देखील देशपांडे यांनी करत राहुल गांधी पप्पू असल्याचा व्हिडिओ त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केल्याचे देशपांडे म्हणाले.

आमच्या प्रश्नाची उत्तरे मिळाली नाहीत

आम्ही अनेक प्रश्न विचारले पण त्याची उत्तरे देखील मिळाली नसल्याचे सांगत अमित शाह यांनी एअर स्ट्राईकच्या २५० चा आकडा दिला. त्या प्रश्नाचे देखील आम्हाला उत्तर मिळाले नसल्याचे सांगत सैन्यापेक्षा व्यापारी शूर आहे का?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच पाच सेकंदात ७ शौचालय कशी बांधली, न्यायाधीशांनी पत्रकार परिषद का घेतली, याचं उत्तर का देत नाही?, २ कोटी रोजगार देणार, असं सांगूनही भाजप काही बोलत नाही, पेट्रोल दरवाढ झाली, त्याबद्दल सरकार काही बोलत नाही, असा आरोप देशपांडे यांनी यावेळी केला. तसेच नोट बंदीनंतर काही कंपन्या बंद झाल्या. त्याचा तपशील द्यावा, असे सांगत त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली. मोदींच्या गावात शौचालय नाही यावर भाजपा का काही बोलत नाही?, हरीसाल बद्दल जी पोलखोल केली, त्यावर ते काही बोलले नसल्याचे देखील देशपांडे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -