घरमुंबईमनसेने पुन्हा केली सरकारच्या खोट्या जाहिरातीची चिरफाड

मनसेने पुन्हा केली सरकारच्या खोट्या जाहिरातीची चिरफाड

Subscribe

कौशल्य इंडियाच्या माध्यमातून सरकारने रेखा वाहटूळे यांची खोटी जाहिरात केल्याचा आरोप मनसेने केला आहे.

कौशल्य इंडियाच्या माध्यमातून सरकारने रेखा वाहटूळे यांची खोटी जाहिरात केल्याचा आरोप मनसेने केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून मोदींच्या खोट्या आश्वासनांची पोलखोल केली. त्याला उत्तर देताना आज, शनिवारी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसेच्या आरोपांचे खंडन केले. मात्र पुन्हा एकदा मनसे नेता संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप कशा खोट्या जाहिराती बनवून जनतेची दिशाभूल करत आहे, हे सांगिलते. यावेळी त्यांनी सरकारच्या जाहिरातीमध्ये घेतलेल्या महिला उद्योजिका रेखा वाहटूळे यांनाच बोलण्याकरता समोर आणले.

- Advertisement -

रेखा वाहूटळे यांनी दिलेली माहिती

माझा मसल्याचा व्यवसाय होता. मी माझ्या हिमतीवर माझा व्यवसाय स्थापन केला होता. मात्र माझ्याजवळ काही लोकं आली आणि त्यांनी जाहिरात घेतली. पण जाहिरातीतील माहिती खोटी आहे. सरकारच्या जाहिरातीवर दाखवल्याप्रमाणे मला कोणतीही मदत मिळालेली नाही. माझ्या नावाचा वापर करून सरकारने ही खोटी जाहिरात केली आहे. मी बँकेत १० लाखाचे कर्ज घ्यायला गेले, तर बँक तारण मागत आहे. तीन वर्षांचा आयटी रिटर्न मागितलं. त्यामुळे मला कोणतही लोन मिळालं नाही. मला सरकारने प्रशिक्षण दिलं पण कोणताच इतर लाभ मला मिळालेला नाही. कौशल्य विकास अंतर्गत मला प्रशिक्षण दिलं पण लाभ मिळाला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -