घरठाणेहिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून या..., मनसेचे शिवसेनेला आव्हान

हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून या…, मनसेचे शिवसेनेला आव्हान

Subscribe

असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?

राज्य सरकारने दहीहंडी (Dahihandi) उत्सवावर लावलेल्या निर्बंधामुळे ठाण्यात मनसे (MNS) आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. मनसे यंदा दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या उत्साहात होती. ठाण्यातील भगवती मैदानात मनसेकडून आंदोलने सुरू होती. मनसेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यासह मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांनी शिवसेनेला खुल आव्हान केल आहे. ‘हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून मंडप उखडायला या. तुम्हाला दाखवतो महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय आहे’, असे आव्हान अविनाश जाधव यांनी केले. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अविनाश जाधव यांनी हे वक्तव्य केले.

दहीहंडी उत्सव नियमांचे पालन करुन साजरा करू द्यावा इतकी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली होती. सोमवारी सकाळपासून ठाण्यात दहीहंडीसाठी स्टेज उभारण्याचे काम सुरू होते. मात्र पोलिसांनी काम बंद करुन कंत्राटदाराला ताब्यात घेतले. आम्ही पोलिसांना सहकार्य करत असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. ‘आम्ही नियमावली मागत आहोत. ते सांगितील तसा उत्सव करायला आम्ही तयार आहोत. महाराष्ट्रात कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याची जबाबदारी उद्धव ठाकरेंनी घेतली का? नाही. मग त्यांच्यावर जेव्हा जबाबदारी येते तेव्हा ते कार्यकर्त्यांकडून घडल आणि जेव्हा आमची जबाबदारी येते तेव्हा तुम्ही ते करायचे नाही असे सांगितले जाते कारण कोविड पसरणार आहे. उद्धव ठाकरे यांनी व्याख्या ठरवली पाहिजे की कोणती जबाबदारी कोणाची’,अशी टोला अविनाश जाधव यांनी लगावला.

- Advertisement -

पुढे अविनाश जाधव यांनी म्हटले की, ‘पोलीस आणि यंत्रणा कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करतात आम्ही त्यांना सहकार्य करू. आम्ही विनंती करायचे काम करणार आहोत. पोलिसांना समोर आणलं तरी पोलीस त्याचे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम करणार. हिंमत असेल तर पोलिसांना बाजूला ठेवून मंडप उखडायला या’, असे आव्हान अविनाश जाधव यांनी शिवसेनेला केले.

‘नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर शेकडो शिवसैनिक आंदोलन करत होते. हिंदू सण म्हटल्यावर लगेच कोरोनाचे कारण दिले जाते. यांना त्यांचे राजकारण करताना कोरोना आडवा येत नाही. असा कोणता कोरोना आहे जो उद्धव ठाकरेंच्या लोकांना होत नाही पण हिंदू सणांमध्ये पसरतो?’, असा सवाल यावेळी अविनाश जाधव यांनी केली.

- Advertisement -

हेही वाचा – दहीहंडी उभारण्यास मनाई, सार्वजनिक कार्यक्रम टाळा, राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -