घरदेश-विदेशAfghanistan Crisis: अफगाणिस्तानातून यूएस फोर्सची माघार घेण्याची आज अंतिम मुदत

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानातून यूएस फोर्सची माघार घेण्याची आज अंतिम मुदत

Subscribe

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची पूर्ण माघार घेण्याची मुदत आज संपत आहे. अशापरिस्थितीत माघार घेण्याच्या काही शेवटच्या तासांमध्ये अमेरिकन सैन्याने (यूएस फोर्स) अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधून आणखी काही लोकांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, काबूल विमानतळावरील रॉकेट हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. रॉकेट हल्ल्यात त्याच्या बाजूने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अमेरिकी सैन्याने म्हटले आहे. रॉकेट हल्ल्यानंतरही काबूलच्या हमीद करजई आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानांचे लँडिंग आणि टेकऑफ सोमवारी देखील सुरूच होते. विमानतळावर पाच रॉकेट डागण्यात आले, परंतु अमेरिकेच्या हवाई संरक्षण यंत्रणांनी ते उधळून लावले, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रवक्ते बिल अरबन यांनी सांगितले.

साधारण दोन आठवड्यांपूर्वी १४ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानवर पूर्णपणे कब्जा केला. तेव्हापासून अमेरिकेने साधारण १ लाख १४ हजार लोकांना अफगाणिस्तातून बाहेर काढले. दरम्यान, अमेरिकेने म्हटले की, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या सुमारे ३०० अमेरिकन लोकांना बाहेर काढण्याची क्षमता आहे. हे काम अमेरिकन सैन्य अध्यक्ष जो बायडन यांनी निर्वासन ऑपरेशन समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या मुदतीपूर्वी करणार असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

तसेच अमेरिकेची सैन्य पूर्णपणे काढून घेतल्यानंतर तेथे दूतावास ठेवण्याची अमेरिकेची कोणतीही योजना नसल्याचे जो बियाडनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी म्हटले आहे. तसेच, ३१ ऑगस्टनंतरही अमेरिकन सैन्य प्रत्येक अमेरिकन नागरिक कायमस्वरूपी रहिवासी तसेच ज्यांनी आम्हाला मदत केली अशा अफगाण लोकांच्या सुरक्षित परताव्याची खात्री करणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर ब्लिन्केन म्हणाले की, ३१ ऑगस्टनंतर विमानतळ खुले ठेवण्यासाठी अमेरिका या क्षेत्रातील इतर देशांसोबत काम करत आहे.


Tokyo Paralympics : भारतीयांचे दुहेरी ‘सुवर्ण’ यश; पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवशी पाच पदके

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -