घरमुंबईराज ठाकरेंनी रामदेव बाबांना सुचवलं 'हे' आसन!

राज ठाकरेंनी रामदेव बाबांना सुचवलं ‘हे’ आसन!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी रामदेव बाबांवर खोचक टिप्पणी करणारं एक व्यंगचित्र काढलं असून त्यात त्यांना नेत्रासन करण्याचा सल्ला देखील दिला आहे.

वेगवेगळ्या प्रकारची योगासनं हा खरंतर योगगुरू रामदेव बाबा यांचा हातखंडा! आख्ख्या जगाला रामदेव बाबा अनेक प्रकारची योगासनं शिकवतात. त्यांचे लाखो अनुयायी देखील आहेत. पण आता चक्क रामदेवबाबा यांनाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वेगळंच आसन शिकवलं आहे. ‘नेत्रासन’ असं या आसनाचं नाव आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंनी ‘हे आसन केल्यामुळे दृष्टी सुधारते’, असा सल्ला उलट रामदेव बाबांनाच दिला आहे. त्यामुळे जगाला आसनं शिकवणाऱ्या रामदेव बाबांना राज ठाकरेंनी शिकवलेलं हे नवं आसन चांगलंच चर्चेत आलं आहे!

कुठे शिकवलं राज ठाकरेंनी आसन?

राज ठाकरेंनी आसन शिकवलं, म्हणजे असा समज होऊ शकतो की ते दोघे कोणत्या कार्यक्रमा भेटले की काय? पण तसं काहीही नसून आपल्या नेहमीच्या शैलीतच राज ठाकरेंनी रामदेव बाबांना हे आसन शिकवलं आहे. अर्थात, व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांनी हे आसन सांगितलं आहे. दिवाळी आणि त्यानंतर देखील भाजप सरकारवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून राज ठाकरेंनी चांगलाच निशाणा साधला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरेंनी निशाणा साधला असून यंदा त्यांच्यासमोर योगगुरू रामदेव बाबा आहेत.

- Advertisement -
Raj Thackeray Cartoon on Ramdev Baba
राज ठाकरेंचं रामदेव बाबांवरचं कार्टून

काय आहे व्यंगचित्रात?

व्यंगचित्रामध्ये राज ठाकरेंनी रामदेव बाबांचं मोठं चित्र समोर काढलं असून त्यांच्या दोन्ही बाजूला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. वर ‘नेत्रासन’ असं मोठ्या अक्षरामध्ये लिहिलं असून ‘हे आसन केल्यामुळे दृष्टी सुधारते’ असा खोचक टोला राज ठाकरेंनी हाणला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याच बाजूला रामदेव बाबांचं नुकतंच केलेलं एक स्टेटमेंट लिहिलं असून त्याखाली ‘मोदी प्रशंसक’ अशी पदवी रामदेव बाबांना कंसामध्ये देण्यात आली आहे.


हेही वाचा – भाजपच्या सत्तेला गेला तडा, राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र!

काय आहे व्यंगचित्राचा संदर्भ?

काही दिवसांपूर्वीच रामदेव बाबांनी देशाच्या आगामी पंतप्रधानांबद्दल वक्तव्य केलं होतं. ‘देशातली सध्याची राजकीय परिस्थिती कठीण असून त्यात नक्की कोण पुढचा पंतप्रधान होणार, याबाबत नक्की काही सांगता येणार नाही’, असं वक्तव्य रामदेव बाबांनी केलं होतं. त्यावर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरेंनी व्यंगचित्राच्या माध्यमातून फटकारे ओढले आहेत.


वाचा काय आहे राज ठाकरेंच्या पोतडीत – माझी पोतडी निवडणुकीच्या वेळी उघडेन!

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -