घरमुंबईराज ठाकरे पावणे दोन तास मतदानासाठी रांगेत उभे

राज ठाकरे पावणे दोन तास मतदानासाठी रांगेत उभे

Subscribe

सतराव्या लोकसभेसाठी आज चौथ्या टप्प्याचे मतदान होत आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी संथगतीने मतदान सुरु असल्याचामुळे मतदारांना त्याचा फटका बसतोय. याला मनसेप्रमुख राज ठाकरे देखील अपवाद नाहीत. ठाकरे आणि त्यांचे कुटुंबिय आज मतदान करण्यासाठी जवळपास पावणे दोन तास रांगेत उभे राहिल्याची माहिती मिळत आहे. राज ठाकरे आज सकाळी ११.३० वाजता दादरच्या बालमोहन विद्या मंदिर शाळेत मतदान केंद्रावर पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत आई कुंदा ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे देखील त्यांच्यासोबत होते. मात्र मतदानाची प्रक्रिया पुर्ण करण्यासाठी त्यांना दीड वाजेपर्यंत वाट पाहावी लागली.

- Advertisement -

 

महाराष्ट्रातील १७ मतदारसंघ तर देशात ९ राज्यातील ७२ मतदारसंघात आज मतदान होत आहे. मात्र महाराष्ट्रात मतदानाचा टक्का खूपच कमी दिसत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत महाराष्ट्रात केवळ २९.९३ टक्केच मतदान झाले आहे. यावर्षी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये पावती पाहण्यासाठी अनेक लोक थांबत आहेत. ईव्हीएम मशीन वर आपल्या पसंतीच्या उमेदवाराचे बटण दाबल्यानंतर व्हीव्हीपॅट मशीनमध्ये त्याची पावती दिसण्यास ७ सेकंद लागतात. तसेच मुंबईच्या अनेक मतदारसंघात आयोगाकडून मतदारांना पावत्या वाटल्या नसल्यामुळेही यादी तपासून मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

- Advertisement -

माध्यमांच्या प्रतिनिधिंना राज ठाकरेंनी झापले

राज ठाकरे यांना मतदान केंद्रवर होत असलेला उशीर पाहून वृत्तवाहिन्यांचे अनेक प्रतिनिधी मतदान केंद्रावर पोहोचले होते. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामुळे इतर सामान्य मतदारांना मात्र त्रास होत होता. हे पाहून राज ठाकरे चांगलेच संतापले. तसेच एका कॅमेरामनला बाजूला करून त्यांनी मतदारांना जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली.

मतदारांना त्रास होत असल्यामुळे राज ठाकरे टीव्ही चॅनलच्या कॅमेरामनवर भडकले! #MyMahanagar #VoteMumbaiVote #VoteIndiaVote Raj Thackeray Fan's Club

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಸೋಮವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 29, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -