घरमुंबईबेस्टच्या जुनाट बसेसचे होणार मोबाईल टॉयलेट्स?

बेस्टच्या जुनाट बसेसचे होणार मोबाईल टॉयलेट्स?

Subscribe

बेस्टच्या अनेक जुन्या बसेसचा वापर मोबाईल टॉयलेट्साठी करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन असून हजारोंच्या संख्येने मुंबईकर दररोज या लोकलने प्रवास करतात. तर बरेच मुंबईकर बेस्टच्या बसचा देखील वापर करतात. मात्र असे असताना देखील बेस्ट तोट्यात जात आहे. त्याचप्रमाणे बेस्टच्या अनेक जुन्या बसेसचा वापर केला जात नसल्यामुळे तशाच पडून आहेत. तसेच खासगी कंपन्या देखील या बसेस विकत घेण्यास नकार देत आहेत. त्यामुळे बसेसचे रुपांतर मोबाईल टॉटलेट्समध्ये करण्यात यावा असा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.

एका मोबाईल टॉयलेट्सकरता ३ लाखाचा खर्च

बेस्टच्या जुनाट बसेसचे रुपांतरण चालत्या फिरत्या टॉयलेट्समध्ये करण्याचा प्रस्ताव बीएमसीमध्ये शिवडीचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी मांडला आहे. या प्रस्तावाचा माहापालिकेत सकारात्मक रीतीने विचार केला जात असून यावर किती खर्च येईल हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. या बसेसमध्ये पुरुष आणि स्त्रियांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी असंही पडवळ याचं म्हणणं आहे. मुंबई महानगरपालिकेने या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिक्रिया दिली असून कंत्राटी तत्वावर ही शौचालय चावण्यास देण्याचा विचार केला जात आहे. एका बसचे शौचालयात रुपांतर करण्यासाठी कमीतकमी ३ लाख रुपये खर्च येऊ शकतो. हा सगळा खर्च कसा हाताळायचा याचा विचार केला जात आहे. दरम्यान महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मात्र या प्रस्तावामुळे वायफळ खर्च होईल अशी भूमिका मांडली आहे. त्यापेक्षा रस्तोरस्ती हाय क्लास टॉलेट्स उभारण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

वाचा – अखेर बेस्ट बस धावली

वाचा – बेस्ट बसचे पास क्लोनिंग करणारी टोळी गजाआड

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -