घरमुंबईमोहने गाळेगावात साफसफाईचा बोजवारा

मोहने गाळेगावात साफसफाईचा बोजवारा

Subscribe

सफाई कर्मचार्‍यांची गैरहजेरी

सतत गैरहजर राहत असणार्‍या सफाई कामगारांमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभागातील मोहने गाळेगाव शेडच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील प्रभागात साफसफाईचा बोजवारा उडाला आहे.मोहने गाळेगाव हजेरी शेडवर 2005 च्या दरम्यान एकूण ऐंशीच्या आसपास सफाई कर्मचारी कार्यरत होते. 2019 साली सफाई कर्मचार्‍यांची वाढ होण्याऐवजी ती घटली असून कामगारांची संख्या आजमितीस 50 ते 55 राहिली आहे. एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्येबरोबरच विविध संकुलने उभी राहत असतांना सफाई कर्मचार्‍यांची कमतरता भासू लागली आहे.

या हजेरी शेडवर चार प्रभाग येत असून, 55 च्या आसपास असणार्‍या या कर्मचार्‍यांना मधून 30 कर्मचारी हजेरी शेडवर हजर राहत असून उर्वरित कर्मचारी गैरहजर राहत आहेत. प्रभाग क्रमांक 12 गाळेगाव येथे तर दररोज केवळ तीनच सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. हा विभाग हा स्लम म्हणून ओळखला जातो. अन्य प्रभागातही परिस्थिती जैसे थे असल्याने, साफसफाई होत नाही. गटारी तुडुंब भरलेल्या आहेत, नियमितपणे जंतुनाशक फवारणी होत नाही. यामुळे अनेकदा नागरिकांना अस्वच्छतेमुळे दवाखाना गाठावे लागत आहे.

- Advertisement -

अ प्रभाग समितीचे सभापती दया शंकर शेट्टी यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रत्येक प्रभागात सफाई कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे योग्यती साफसफाई होत नाही. मात्र पालिका आयुक्तांकडे वाढीव साफ सफाई कर्मचारी देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या महिन्यात एकाच प्रभागात पाच ते सात’जणांना डेंग्यू झाला होता. तर, एक रुग्ण डेंग्यूमुळे दगावला होता. अपुर्‍या कर्मचार्‍यांमुळे साफसफाई होत नसल्याने नागरिक पालिकेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करू लागले आहेत. यासंदर्भात प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांना विचारले असता 50 कर्मचार्‍यांची नेमणूक असून या मध्ये कोणी आजारी असल्याने गैरहजर असल्याचे सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -