घरमहाराष्ट्रडांबराला चिकटलेल्या नागाला जीवदान

डांबराला चिकटलेल्या नागाला जीवदान

Subscribe

डांबरात अडकलेल्या विषारी नागाला जीवदान देण्याचे काम चिरनेर येथील सर्पमित्र आणि रायगड भूषण जयवंत ठाकूर यांनी केले. सोमवारी चिरनेर येथील पी. पी. खारपाटील गोदामात नाग अडकला असल्याचा फोन ठाकूर यांना आला. त्यांनी सहकारी राजेंद्र पाटील यांच्या समवेत तेथे जाऊन डांबरात चिकटलेल्या सापाला सोडविण्याचे काम केले.

हा नाग डांबरात संपूर्णपणे माखला होता. नाकपुडी थोडीशी बाहेर असल्यामुळे त्याचा श्वासोच्छवास सुरू होता. रॉकेल किंवा इतर केमिकल लावून डांबर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला इजा होण्याची शक्यता होती. मात्र ठाकूर यांनी सर्वप्रथम डोके आणि नाक मोकळे करून त्याचा श्वास मोकळा केला. मात्र नाग चावण्याची शक्यता वाढली होती. तरी देखील अलगद हाताने त्याला डांबरातून मुक्त करण्यात आले. साडेतीन फुटांच्या या नागाचे कात टाकल्यानंतर संपूर्ण डांबर निघून जाईल, असे ठाकूर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -