घरमुंबईमहाराष्ट्रात १००० हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; २४ तासांत २२१ नवे रूग्ण!

महाराष्ट्रात १००० हून अधिक पोलिसांना कोरोनाची लागण; २४ तासांत २२१ नवे रूग्ण!

Subscribe

मागील २४ तासात तब्बल २२१ पोलीस कोरोना पॉझिटिव्ह तर राज्यात एकूण १००७ पोलिसांना कोरोनाची लागण

देशभरात कोरोना व्हायरसचे सर्वाधिक नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील कोरोनाशी लढा देणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ११ मे रोजी सकाळपर्यंत १००० हून अधिक महाराष्ट्र पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर धक्कादायक म्हणजे गेल्या २४ तासांत २२१ महाराष्ट्र पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर येत आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, राज्यात एकूण १००७ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ७ जणांचा मृत्यू झाला असून ११३ जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.


Corona: मुंबईतील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा बळी; राज्यात ७५०हून अधिक पोलिसांना संसर्ग


देशभरात कोरोनाचे सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. तसेच कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये म्हणून राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनची पूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांना कठोर मेहनत घ्यावी लागत आहे. अशा परिस्थितीत बऱ्याचदा आपल्या जीवाची पर्वा न करता पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसताय. मात्र कोरोना संसर्ग झालेल्या लोकांच्या संपर्कात किंवा हॉटस्पॉट असणाऱ्या भागात जात असल्यामुळे त्यांनाही कोरोनाची लागण होत असल्याचे समोर येत आहे.

- Advertisement -

९०१ कर्मचारी आणि १०६ अधिकाऱ्यांना लागण

कोरोनाविरोधातील युद्धात लढा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढला असून त्यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात आता पर्यंत सात पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये ९०१ कर्मचारी आणि १०६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस दलातील चार आणि पुणे, नाशिक, सोलापूर पोलीस दलातील प्रत्येकी एका पोलिसाने प्राण गमावले आहेत.

सात पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू

  • मुंबई पोलीस दल – चंद्रकांत पेंदूरकर, हेड कॉन्स्टेबल (वाकोला पोलीस स्टेशन)
  • मुंबई पोलीस दल – संदीप सुर्वे, हेड कॉन्स्टेबल
  • मुंबई पोलीस दल – पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे (कुर्ला वाहतूक विभाग)
  • पुणे पोलीस दल – हाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे, (फरासखाना पोलीस स्टेशन)
  • सोलापूर पोलीस दल – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख, (एमआयडीसी पोलीस स्टेशन)
  • मुंबई पोलीस दल – सुनील दत्तात्रय करगुटकर, (विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन)
  • नाशिक पोलीस दल – साहेबराव झिपरु खरे, हेड कॉन्स्टेबल (पोलीस मुख्यालय)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -