घरमुंबईभिवंडीतील गिरणी कामगारांचे मोफत घरांसाठी आंदोलन

भिवंडीतील गिरणी कामगारांचे मोफत घरांसाठी आंदोलन

Subscribe

महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मुंबई गिरणी कामगारांचे पुनर्वसन व त्यांच्या मालकी हक्काचे मोफत घर मिळवून देण्यासाठी जो पुनर्वसन कायदा केला आहे. त्या धर्तीवर भिवंडी तालुक्यातील विश्वभारती सूतगिरणी या बंद पडलेल्या कंपनीतील 1500 कामगारांना मोफत घरे मिळावीत या मागणीसाठी भिवंडी तहसीलदार कार्यालयाबाहेर विश्वभारती कामगार संघातर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. विश्वभारती कामगार संघाचे प्रमुख कोमलराम जयसवाल यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो कामगार व त्यांचे कुटुंबीय सहभागी झाले होते. सायंकाळी कामगार संघाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदार शशीकांत गायकवाड यांना सादर केले.

भिवंडी तालुक्यातील कवाड विश्वभारती फाटा या ठिकाणी 1968 मध्ये सुरु झालेली सूतगिरणी 1995 मध्ये तोट्यात आल्याने मालकाने बंद केली. या सुतगिरणीत सुमारे 1500 कामगार कायम स्वरूपी काम करीत असताना त्यांच्यावर गिरणी बंद पडल्याने उपासमारीची वेळ आली. या बाबतीत संघाचे प्रमुख कोमलराम जयसवाल यांनी महाराष्ट्र राज्य सरकारने मुंबई गिरणी कामगारांचे पुनर्वसन योजनेमध्ये येथील कामगारांना सामावून घेऊन विश्वभारती सुतगिरणीच्या कवाड येथील मिळकतीमधील 4 हेक्टर मोकळी जागा कामगारांच्या गृहनिर्माण योजने करीत मंजूर करावी, अशी मागणी राज्याचे महसूल मंत्र्यांकडे केली आहे. परंतु त्याबाबत कार्यवाही झाली नाही. त्यामुळे कामगारांनी तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -