घरमुंबई'दादर चौपाटी होणार आंतरराष्ट्रीय लँडमार्क'

‘दादर चौपाटी होणार आंतरराष्ट्रीय लँडमार्क’

Subscribe

दादर चौपाटीला नवा लूक देणार असल्याची घोषणा खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. आज याच कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडला.

दादर चौपाटीला होणाऱ्या नव्या विविंग गॅलरीमधून समोरच ‘सी लिंक’ दिसेल. या ‘सी लिंक’वर दरवर्षी ३१ डिसेंबरला मोठ्या प्रमाणात आतिषबाजी आणि लेझर शो करण्यात येतील. ही आतषबाजी आंतरराष्ट्रीय पातळीवर एक नवं लँडमार्क होईल, अशी घोषणा खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या दादर- माहीम चौपाटीच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा बुधवारी पार पडला. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी आमदार सदा सरावणकर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत, माजी महापौर श्रद्धा जाधव, नगरसेवक समाधान सरवणकर, उर्मिला पांचाळ, मिलिंद वैद्य, प्रीती पाटणकर, शीतल गंभीर, नगरसेवक मिलिंद वैद्य, भाजप माहीम विधानसभा अध्यक्ष विलास आंबेकर,  वास्तुरचनाकार शशांक मेहंदळे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दादर-माहीम चौपाटीला मिळणार नवा लूक

वरळी ते माहीम चौपाटी या सुमारे ५ किमीच्या समुद्रकिनाऱ्याला ‘नवा लूक’ देणाऱ्या या प्रकल्पाचा पहिला टप्पा ज्ञानेश्वर उद्यान ते पांडुरंग नाईक मार्ग हा सुमारे ४७५ मीटरचा आहे. सुमारे ४.७२ कोटी रुपये खर्च करून या पहिल्या टप्प्यात सौंदर्यीकरण केले जाणार आहे. यामध्ये २० फूट लांबीचा पदपथ, सोलार पॅनल बसविलेल्या शेड्स, दादर चौपाटीचा इतिहास सांगणारी भित्तिचित्रे, लँडस्केप गार्डन्स, विविंग गॅलरी अशा अनेक सोयीचा अंतर्भाव असणार आहे. सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत हा पहिला टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर पुढील टप्प्यांत संपूर्ण ५ किमीच्या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.

स्थायी समिती अध्यक्ष असल्यापासून दादर चौपाटीचा कायापालट करणं, हे माझं स्वप्न होतं. त्यासाठी प्रयत्नही करत होतो. मात्र, काही वर्षांपूर्वी काही मंडळींनी केवळ राजकीय स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने चौपाटीवर टेट्रापॉड टाकले आणि पदपथ बनविला. मात्र, आता शास्त्रीय पद्धतीने या सौदर्यीकरणाला सुरवात होतेय, याचा मला आनंद आहे.
– राहुल शेवाळे, खासदार (दक्षिण- मध्य मुंबई)
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -