घरमुंबईभिवंडीच्या अतिश बारवर छापा ४ बांग्लादेशी बारबालांना अटक

भिवंडीच्या अतिश बारवर छापा ४ बांग्लादेशी बारबालांना अटक

Subscribe

भिवंडीच्या नारपोली पोलिस ठाण्याचा नुकताच पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी ही कारवाई केली आहे.

भिवंडी शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात लेडीज बार आहेत. या बार मध्ये बांग्लादेशी बारबाला खुलेआम काम करतात. दरम्यान, या प्रकरणी बारच्या हद्दीतील नारपोली पोलिसांनी कारवाई करत चार बांग्लादेशी महिलांना अटक केली आहे. नुकताच नारपोली पोलीस ठाण्याचा पदभार घेतलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी ही कारवाई केली आहे. त्यांच्या पथकाद्वाने धडक कारवाई करीत वळ येथील अतिश बारवर छापा टाकून ४ बांग्लादेशी बारबालांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याने परिसरातील लेडीज बार चालकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.

घुसखोर बांग्लादेशी

रिहाना उर्फ पिंकी मंडोळ, मीना उर्फ सोनिया मंडोळ, फरीदा सरदार, फजीला शेख या चार बांग्लादेशी बारबाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या चारही बारबाला घुसखोर बांग्लादेशी नागरिक असून यांनी कोणत्याही वैध प्रवाशी कागदपत्राशिवाय अवैध मार्गाने भारत-बांग्लादेश सीमेवरून लपतछपत भारतीय सरहद्दीमध्ये प्रवेश केला. भिवंडीच्या नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या अनधिकृतपणे वास्तव्य करीत होत्या. दरम्यान, त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बार चालकांमध्ये खळबळ

भिवंडीच्या काल्हेर, रांजणोली नाका या परिसरात असलेल्या लेडीज बार मध्ये देखील मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी बारबाला काम करतात. त्यांच्यावर स्थानिक पोलीस का कारवाई करीत नाही. असा प्रश्न नागरीकांनी उपस्थित केला आहे. मात्र नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांच्या धडक कारवाई मुळे परिसरातील लेडीज बार चालकांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. अतिश बार प्रमाणे शिंदे इतर बारवर सुद्धा कारवाई करणार का याकडे नागरीकांच लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -