घरमुंबईपुणेकरांची बोलती बंद; मतदानाच्या टक्केवारीत मुंबईकर भारी

पुणेकरांची बोलती बंद; मतदानाच्या टक्केवारीत मुंबईकर भारी

Subscribe

शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याला मुंबईने टाकले मतदानाच्या टक्केवारीत मागे...

आपल्या कुजकट आणि सदानकदा बौद्धिक पाझळणाऱ्या स्वभावामुळे पुणेकर प्रसिद्ध आहेत. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र याच पुणेकरांची बोलती बंद झाली आहे. आमचे पुणेच कसे सर्व बाबतीत बेस्ट आहे? हे दर्शविण्याचा आटापिटा पुणेकर करत असतात. मात्र यंदा मुबंईसहित सर्वच प्रमुख शहरांनी पुण्याहून अधिक मतदान करत पुण्याला बोट दाखवले आहे. आज चौथ्या टप्प्याचे मतदान झाल्यानंतर मुंबई, नाशिक, ठाणे आणि नंदुरबार येथे पुण्याहून अधिक मतदान झाले असल्याचे समोर आले आहे.

तिसऱ्या टप्प्यात पुणे मतदारसंघात मतदान झाले होते. यावेळी पुणेकरांनी मतदानाकडे सपशेल पाठ फिरवली. परिणाम यावेळी केवळ ४९ टक्के एवढेच मतदान पुण्यात झाले होते. २०१४ ची तुलना करता यावेळी ४.२७ टक्क्यांनी हे मतदान घटले होते. दुसऱ्या बाजुला मुंबईतील सहा मतदारसंघात मतदानाचे अर्धशतक पुर्ण केलेले आहे. मुंबई उत्तर – 59.32 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 54.71 टक्के, मुंबई उत्तर पूर्व – 56.31 टक्के, मुंबई उत्तर मध्य – 52.84 टक्के, मुंबई दक्षिण मध्य – 55.35 टक्के आणि मुंबई दक्षिण – 52.15 टक्के इतके मतदान झाले आहे.

- Advertisement -

पुण्यातील मतदारांनी मतदानात उदासीनता दाखवल्यामुळे अर्धशतकही पुर्ण करता आले नाही. नेहमीप्रमाणे पुणेकरांनी या कमी मतदानांवर विविध कारणे दिली आहेत. वोटर स्लीप घरोघरी पोहोचत्या न केल्यामुळे मतदान करण्यास अडचणी आल्याचे पुणेकरांचे म्हणणे आहे. तर काही पुणेकर म्हणाले की आमचे नाव मतदार यादीतच नाही आणि ते नाव तपासण्याचा आम्हाला वेळच नाही मिळाला, अशी अनेक कारणे पुणेकरांनी दिली होती.

आजच्या शेवटच्या टप्प्यामध्ये 17 लोकसभा मतदरासंघांकरिता अंदाजे 57 टक्के इतके मतदान झाले असून राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाले. महाराष्ट्रामध्ये एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी दिली. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे कुमार यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -