घरमुंबई'मुंबईकर जनतेची ही घोर फसवणूक आहे'

‘मुंबईकर जनतेची ही घोर फसवणूक आहे’

Subscribe

मुंबईतील २२६ मोकळे भूखंड असून त्यातील २६ भूखंड हे शिवसेना आणि भाजपाच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत, त्यामुळे हे २६ मोकळे भूखंड मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा आणि मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड यांना महानगपालिकडे केली.

मुंबईमध्ये २२६ मोकळे भूखंड असून त्यातील २६ मोकळे भूखंड शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांच्या ताब्यात आहेत. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या वेळेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला आश्वासन दिले होते की, हे सर्व २२६ मोकळे भूखंड मुंबई महापालिकेच्या ताब्यात घेऊ. परंतु २ वर्षे झाली तरीही त्यातील २६ मोकळे भूखंड हे शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या ताब्यात आहेत. हे नेते त्या भूखंडांचे विकास आणि देखरेख करण्याच्या नावाखाली व्यावसायिकीकरण (मोठे क्लब उभारून) करून वर्षानुवर्षे प्रचंड नफा कमावत आहेत. शिवसेना भाजप नेत्यांचा हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा म्हणाले.

मुंबईकर जनतेची ही घोर फसवणूक

तसेच मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना दिलेले वचन अजूनही पूर्ण केलेले नाही. मुंबईकर जनतेची ही घोर फसवणूक आहे. ज्या शिवसेना-भाजप नेत्यांकडे हे भूखंड आहेत. त्यांना मुंबई महानगरपालिकेने १ वर्षांपूर्वी हे भूखंड महापालिकेच्या ताब्यात देण्याची नोटीस पाठवली होती. पण या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि या भूखंडावर कब्जा करून बसले. आता तर हे २६ मोकळे भूखंड शिवसेना-भाजपच्या नेत्यांना कायमस्वरूपी आंदण म्हणून दिले आणि टेंडर प्रक्रियेतून सुद्धा वगळले आहेत. याला आमचा तीव्र विरोध आहे. आमची मुंबई काँग्रेसतर्फे अशी मागणी आहे की, हे २६ मोकळे भूखंड जे शिवसेना भाजप नेत्यांकडे आहेत ते त्वरित मुंबई महानगरपालिकेने आपल्या ताब्यात घ्यावेत, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

शिवसेना-भाजपचे नेते या भूखंडांचा व्यावसायिक उपयोग करतात

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड या संदर्भात म्हणाले की, या २२६ मोकळ्या भूखंडांच्या विकास आणि देखभालीसाठी मुंबई महापालिकेतर्फे टेंडर काढण्यात आल्याची एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्यानुसार या २२६ मोकळ्या भूखंडांचा विकास आणि देखरेख करण्याचे काम सामाजिक संस्थांना देण्यात येईल. पण टेंडरिंग करताना २२६ पैकी २०० भूखंडांकरीता टेंडर काढण्यात आले आहेत. २६ भूखंड मुंबई महापालिकेने या टेंडर प्रक्रियेतून वगळले आहेत. हे २६ भूखंड शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे आहेत. शिवसेना आणि भाजपचे नेते या भूखंडांचा व्यावसायिक उपयोग करतात. तसेच महापालिकेने हे भूखंड जाणून बुजून वगळून हे भूखंड शिवसेना-भाजपच्या नेत्यांना कायमस्वरूपी बहाल केले आहेत. हा खूप मोठा भ्रष्टाचार आहे. जनतेची घोर फसवणूक आहे. आमची मुंबई महापालिका आयुक्तांकडे अशी मागणी आहे की, हे २६ भूखंड महापालिकेने ताब्यात घ्यावेत आणि टेंडर प्रक्रियेमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा, म्हणजेच टेंडर प्रक्रियेमध्ये सर्वच्या सर्व मुंबईतील २२६ भूखंडांचा समावेश करावा, असे मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष एकनाथ गायकवाड म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -