घरमुंबईराज्य 'पुरात', उद्धव ठाकरे पक्ष'प्रवेशात'; विरोधकांची जोरदार टीका!

राज्य ‘पुरात’, उद्धव ठाकरे पक्ष’प्रवेशात’; विरोधकांची जोरदार टीका!

Subscribe

गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे परिसरात चक्क पूरस्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे परिसरात चक्क पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणारी शिवसेना सध्या पक्षप्रवेशामध्ये व्यग्र असल्याचे पहायला मिळत आहे. याचे प्रत्यय बुधवारी पाहायला मिळाले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेखर गोरे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमातून दिसून आला.

मातोश्रीवर रंगला पक्ष प्रवेशाचा सोहळा

दरम्यान, आज संध्याकाळी मातोश्रीवर खास पक्षप्रवेशाचा कार्यक्रम रंगल्याचे पहायला मिळाले असून, माण विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे माजी नेते शेखर गोरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थिती हाती शिवबंधन बांधले. त्यामुळे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करणाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलली आहे का?, असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. दरम्यान, या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानंतर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेचे राजकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून स्थानिक आमदार आणि खासदार माझ्या संपर्कात आहेत. मी आणि आदित्य पूर परिस्थिती बघून जाऊ, सांगली आणि कोल्हापूरात गंभीर परिस्थिती असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मोठा पूर येऊन गेल्यानंतर आरोग्याची एक दुसरी भीती असते. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यात येईल, असे सांगितले.

- Advertisement -

धनंजय मुंडेंची उद्धव ठाकरेंवर टीका

या सर्व प्रकारावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र टीका केली असून, या लोकांना जनतेशी काहीही देणघेण नाही. हे फक्त आमदार फोडून सत्ता मिळवण्यात व्यग्र आहे. याच्या आधी असे कधीच महाराष्ट्रात घडले नव्हते. त्यामुळे ही निंदनीय बाब म्हणावी लागेल, अशी टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -