घरक्राइमMumbai Crime: श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती! निजामुद्दीनने पूनमची हत्या करुन केले तुकडे

Mumbai Crime: श्रद्धा वालकर प्रकरणाची पुनरावृत्ती! निजामुद्दीनने पूनमची हत्या करुन केले तुकडे

Subscribe

मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूनम या पीडितेच्या हत्येचे प्रकरण उघड करत पोलिसांनी आरोपी निजामुद्दीन अली याला अटक केली आहे.

मुंबई: मुंबईतील मानखुर्द परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूनम या पीडितेच्या हत्येचे प्रकरण उघड करत पोलिसांनी आरोपी निजामुद्दीन अली याला अटक केली आहे. त्याचे मृतकासोबत प्रेमसंबंध होते. 18 एप्रिल रोजी पूनमचे ​​अपहरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. निजामुद्दीन अली याने तिचा पाण्यात बुडवून खून केला आणि त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये बांधून निर्जनस्थळी फेकून दिला, असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. स्थानिक लोक याला लव्ह जिहाद म्हणत आहेत. (Mumbai Crime Mankhurd Nizamuddin chops Poonam into pieces and throw)

नेमकं घडलं काय? (Mumbai Crime) 

आरोपी सँडहर्स्ट रोड परिसरात फूटपाथवर किंवा मग टॅक्सीतच राहत होता. पूनम घरकामं करायची. तिथून ती सुटल्यानंतर शेअर टॅक्सीने आपल्या घरी जायची. शेअर टॅक्सीने प्रवास करताना निजामुद्दीनशी तिची ओळख झाली. त्यानंतर ती सातत्याने निजामुद्दीनच्याच टॅक्सीतून प्रवास करत असे. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.

- Advertisement -

निजामाने आपण बॅचलर असल्याचं त्या मुलीला सांगितलं होतं, पण त्याचं लग्न झालेलं होतं आणि तो एका मुलाचा बापही होता. त्यांचे कुटुंब उत्तर प्रदेशातील लखनौ येथे राहते. त्याचं सत्य समोर आल्यानंतर दोघांमध्ये जोरदार भांडण झाले आणि निजामाने पूनमची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली.

तर दुसरं असंही कारण सांगितलं जात आहे की, पूनमचे इतरांसोबतही प्रेमसंबंध असल्याचा निजामुद्दीनला संशय होता आणि याच संशयातून त्याने पूनमला भेटायला बोलावून तिचा खून केला. नेमकं कारण काय ते अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, पोलीस तपासात मात्र नेमकं कारण काय ते स्पष्ट होईल.

- Advertisement -

दोषींना शिक्षा होणार…

दरम्यान, याप्रकरणी राज्य सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पूनमच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दोषींना शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आरोपीची चौकशी करण्यात व्यस्त आहेत.

हत्येप्रकरणी टॅक्सी चालकाला अटक

19 एप्रिलला निजामाने पूनमची हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. यानंतर त्याने ते तुकडे गोणीत भरून नवी मुंबई परिसरात निर्जनस्थळी फेकले. 25 एप्रिल रोजी आजूबाजूच्या लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला, पोस्टमार्टमसाठी पाठवला, प्रकरणाचा तपास सुरू केला आणि निजामापर्यंत पोहोचले. निजामाने पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला आहे.

(हेही वाचा: Mumbai Crime : 60 लाखांची फसवणूक; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -