घरक्राइमMumbai Crime : न्यूड व्हिडीओ कॉल... सेक्सटॉर्शनचे जाळे अन् 39 वर्षीय तरुणाला लाखाचा फटका

Mumbai Crime : न्यूड व्हिडीओ कॉल… सेक्सटॉर्शनचे जाळे अन् 39 वर्षीय तरुणाला लाखाचा फटका

Subscribe

Mumbai Crime : मुंबईतील जुहू परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या परिसरात राहणाऱ्या एका 39 वर्षीय तरुणाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात (web of sextortion) ओढत न्यूड व्हिडीओ व्हायरल (Nude video viral) करण्याची धमकी देत अज्ञाताने लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी तरुणाने जुहू पोलीस (Juhu Police station) स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. (Mumbai Crime Nude video call Sextortion network and 39 year old youth hit with Rs one laksh)

हेही वाचा – कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यासमोर शिवसेनेच्या दोन्ही गटांचं आंदोलन; कार्यकर्त्यांकडून किल्ल्यात प्रवेशाचा प्रयत्न

- Advertisement -

तक्रारदार तरुणाशी तरुणीच्या नावाने इंस्टाग्रामवरती संपर्क साधण्यात आला. या तरुणीने तक्रारदाराशी चॅटिंग करून व्हिडीओ कॉल करण्यासाठी त्याचा व्हॉट्सअप नंबर मागितला. तरुणीने समोरून व्हिडीओ कॉल करून आधी स्वतःचे कपडे उतरवले आणि त्यानंतर तरुणाला कपडे उतरवण्यास सांगितले. तरुण कपडे उतरत असताना तरुणीने त्याचे रेकॉर्डिंग करून घेतले. त्याानंतर हे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. तरुण घाबरला आणि त्याने तरुणीचा मोबाईल नंबर ब्लॉक करून आपले इंस्टाग्राम अकाउंट डिलीट केले. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी तरुणाला अनोळख्या नंबर वरून पुन्हा कॉल आला.

हेही वाचा – ‘सरकार औटघटकेचं असल्यामुळे बडबडत असतील’; फडणवीसांच्या ‘त्या’ दाव्यावर राऊतांचा टोला

- Advertisement -

कॉलवर आपण दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत असून तुमचे न्यूड व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ते डिलीट करण्यासाठी तुम्ही युट्युब वाल्याशी बोलून घ्या, असे सांगत Youtube वाल्याचा नंबर तरुणाला देण्यात आला. तरुणाने Youtube वाल्याला फोन केला असता त्याने तरुणाकडून व्हिडीओ डिलीट करण्याच्या नावाखाली तब्बल 1 लाख 4 हजार रुपयांची मागणी केली. मात्र वारंवार पैशाची मागणी होऊ लागल्यामुळे तरुणाला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तरुणाच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुहू पोलिसांनी कलम 385,419 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा नुसार कलम 66c, 66d अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जुहू पोलीस पुढील तपास करत आहेत. हा प्रकार 17 जून व 18 जून या काळात घडला.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -