घरमुंबईमुंबईतील डॉक्टरांकडून 'जागतिक योग दिन' साजरा

मुंबईतील डॉक्टरांकडून ‘जागतिक योग दिन’ साजरा

Subscribe

रुग्णांची काळजी घेणारे डॉक्टर आज सकाळी योगा करताना दिसले

जागतिक योग दिन हा २१ जून रोजी संपूर्ण जगात मोठ्या उत्स्हाने साजरा केला जातो. जागतिक योग दिनानिमित्ताने अनेकजणं योगा करताना पाहायला मिळाले. एवढेच नव्हे तर, एरवी रुग्णांना तपासणारे डॉक्टर यांचाही यात मोठा सहभाग होता. यात मुंबईतील अनेक महापालिकेच्या अनेक रुग्णालयातील डॉक्टरचा सहभाग होता. यावेळी योग दिनाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला आहे.

मुंबईत आज सकाळपासूनच अनेक ठिकाणी योगा प्रशिक्षणाचे आयोजन‌ करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील पालिकेच्या रुग्णालयामधील डॉक्टरांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही योगा दिनाला चांगला प्रतिसाद दिला. मुंबईतील केईएम,‌नायर आणि सायन या तिन्ही रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सकाळी उठून रुग्णालयाच्या आवारातच योगा केला. सरकारी रुग्णालयासहीत जे.जे, सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयामधील डॉक्टरांनीही योगा करत आपल्या दिवसाची सुरुवात केली. योगा कार्यक्रमात रुग्णालयाचे प्राध्यापक, विभागप्रमुख, पथक प्रमुख, कक्षप्रमुख यांच्यासह शिकाऊ विद्यार्थीदेखील उपस्थित झाले. सकाळी ७ वाजताच या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -