घरमुंबईMumbai Fire : वाळकेश्वर येथे इमारतीमध्ये आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Mumbai Fire : वाळकेश्वर येथे इमारतीमध्ये आग; सुदैवाने जीवितहानी टळली

Subscribe

सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे आगीमुळे नुकसान झाले.

मुंबई : वाळकेश्वर येथील तळमजला अधिक 21 मजली इमारतीमध्ये गुरुवारी (19 ऑक्टोबर) सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे इमारत परिसरात खळबळ उडाली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले व आग विझविली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. (Mumbai Fire  Fire in a building at Walkeshwar Fortunately there was no loss of life)

सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे आगीमुळे नुकसान झाले. महापालिका आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, वाळकेश्वर येथे तळमजला अधिक 21 मजली सोहम या इमारतीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये गुरुवारी सकाळी 10.50 वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या वृत्तामुळे सदर परिसरात खळबळ उडाली. या आगीत दुसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटचे नुकसान झाले. तसेच, या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, उपकरणे, एसी युनिट व इतर सामान वगैरे जळून खाक झाले. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

- Advertisement -

हेही वाचा : तुष्टीकरण सोडून देश प्रथम ही भूमिका घेणार का? नारायण राणेंचा शरद पवारांना सवाल

आगीचे कारण अस्पष्ट

दोन फायर इंजिन, जंबो वॉटर टँकर यांच्या साहाय्याने सदर आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र ही आग का व कशी काय लागली, याबाबत स्थानिक पोलीस, अग्निशमन दलाचे संबंधित अधिकारी शोध घेत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यातील सूतगिरण्यांना सरकारचा दिलासा; पुढील पाच वर्षे कर्जावरील व्याज भरणार

गोरेगाव आग दुर्घटना याच महिन्यांतील

गोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीत याच महिन्यात आग लागली होती. ही घटना एवढी भीषण होती की त्यात अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुबांना आपले संसार सावरण्यासाठी प्रति कुटुंब 50 हजार रुपये तातडीने वितरीत करण्याचे निर्देश दिले होते. त्याचबरोबर या इमारतीचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देतानाच एसआरएच्या इमारतींना संकटकालीन मार्ग म्हणून बाहेरच्या बाजूने लोखंडी जिने बसविण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -