घरताज्या घडामोडीबॉलीवूडकरांनी आयकर विभागाला लावला ३५० कोटींचा चुना, तापसीने घेतले ५ कोटी कॅश

बॉलीवूडकरांनी आयकर विभागाला लावला ३५० कोटींचा चुना, तापसीने घेतले ५ कोटी कॅश

Subscribe

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यासह बॉलीवूडमधील अनेक दिग्गज आयकर विभागाच्या रडारवर आहेत. याचपार्श्वभूमीवर कालपासून आयकर विभागाने तापसी आणि अनुरागच्या मुंबई -पुणे कार्यालयासह इतर प्रॉडक्शन हाऊसवरही छापे मारले. यादरम्यान बॉलीवूडकरांनी सरकारला ३५० कोटींचा चुना लावल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या छापेमारीत महत्वाचे दस्तावेज अधिकाऱ्यांच्या हाती लागले आहेत. याबद्दल विचारता प्रॉडक्शन हाऊसच्या एकाही अधिकाऱ्याला समाधानकारक उत्तरे देता आले नाहीत. या प्रॉडक्शन हाऊसेसनी तब्बल ३५० कोटींची करचोरी केली आहे. यात कोट्यवधी रुपयांचे व्यवहार हे रोख झाल्याचे समोर आले आहे. तापसीने चित्रपटासाठी ५ कोटी रुपये रोख घेतल्याचेही समोर आले आहे. आयकर विभागाने मुंबई, पुणे,दिल्ली आणि हैदराबाद येथील प्रॉडक्शन हाऊसेसवर छापे घातले आहेत. मिळालेल्या कागदपत्रानुसार या सर्वच प्रॉडक्शन हाऊसेसने चित्रपट निर्मितीमधून बक्कळ पैसा कमावला. मात्र कर भरले नाहीत. याबद्दल त्या त्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता कोणीही हिशोब देऊ शकलेले नाहीत. यात दोन नामवंत प्रॉडक्शन कंपन्याचाही समावेश आहे. अजून काही दिवस ही छापेमारी सुरूच राहणार आहे. आयकर विभागाच्या या छापेमारीमुळे बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -