घरठाणेMumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; 'या' कारणाने पुढील 41 दिवस 5...

Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ कारणाने पुढील 41 दिवस 5 टक्के पाणी कपात

Subscribe

मुंबई : मुंबई महापालिका जल अभियंता खात्याने भांडूप जलशुद्धीकरण केंद्राची परिरक्षण विषयक कामे हाती घेतली आहेत. या कामांमुळे 15 मार्चपासून 24 एप्रिलपर्यंत म्हणजे 41 दिवस मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 5 टक्के पाणी कपात केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी आवश्यक पाण्याचा साठा अगोदरच करून ठेवावा आणि त्याचा जपून, काटकसरीने वापर करावा, असे आवाहन जल अभियंता खात्यकडून करण्यात आले आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई महापालिका जल अभियंता खात्याचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. (Mumbai Mumbaikars use water sparingly 5 percent water reduction for the next 41 days)

हेही वाचा – Election Commission : निवडणूक आयुक्तांची नेमणूक होण्यापूर्वीच खोटी अधिसूचना व्हायरल

- Advertisement -

भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून मुंबई महापालिकेच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील हे सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडूप संकुल येथे 1 हजार 910 दशलक्ष लीटर आणि 900 दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्‍यापैकी 900 दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन 990 दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.

900 दशलक्ष लीटर क्षमतेच्‍या या जलशुद्धीकरण केंद्रातील मोठ्या जलशुद्धीकरण प्रक्रिया टाक्या स्वच्छ करण्यासाठी पावसाळ्यापूर्वीची परिरक्षण कार्यवाही सध्‍या हाती घेण्‍यात आली आहे. परिणामी 15 मार्चपासून ते 24 एप्रिलपर्यंत मुंबई महापालिकेकडून संपूर्ण मुंबई क्षेत्रासाठी होणाऱ्या एकूण 3,850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्यात 5 टक्के पाणी कपात करण्‍यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : …मतदारसंघाची माहिती घेतल्यानंतर आम्ही निलेश लंकेंना उमेदवारी दिली – शरद पवार

वीस दिवसांपूर्वी तलावातील पाणीसाठा

  1. अप्पर वैतरणा – 1,65,199 दशलक्ष लिटर
  2. मोडक सागर – 45,608 दशलक्ष लिटर
  3. तानसा – 78,275 दशलक्ष लिटर
  4. मध्या वैतरणा – 25,951 दशलक्ष लिटर
  5. भातसा – 3,13,761 दशलक्ष लिटर
  6. विहार – 15,239 दशलक्ष लिटर
  7. तुळशी – 4,502 दशलक्ष लिटर

एकूण – 6,48,535 दशलक्ष लिटर (44.81 टक्के)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -