घरमुंबईगणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी, मुंबई मनपाने नवीन हमीपत्रातून 'ही' अट काढली

गणेश मंडळांसाठी आनंदाची बातमी, मुंबई मनपाने नवीन हमीपत्रातून ‘ही’ अट काढली

Subscribe

गेल्या दोन वर्षांपासून गणेश उत्सवावरील निर्बंध शिथील जरी करण्यात आलेले असले तरी काही अटी मात्र राज्य शासनाकडून लागू करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता शासनाकडून लागू करण्यात आलेल्या अटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

Mumbai Ganeshotsav : गेल्या तीन वर्षांपूर्वी देशभरासह महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलेले होते. ज्यामुळे महाराष्ट्रात अनेक सणांवर बंदी घालण्यात आलेली होती. महाराष्ट्रातील सर्वांच्याच जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवावर देखील कोरोनाचे सावट पसरलेले होते. त्यामुळे गणेशोत्सवावर अनेक निर्बंध लावण्यात आलेले होते. गेल्या दोन वर्षांपासून गणेश उत्सवावरील निर्बंध शिथील जरी करण्यात आलेले असले तरी काही अटी मात्र राज्य शासनाकडून लागू करण्यात आलेल्या होत्या. परंतु आता राज्य शासनाकडून लागू करण्यात आलेल्या अटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुंबई महानगरपालिकेने देखील काही अटींना वगळून आता नव्याने हमीपत्र जारी केलेले आहे. (Mumbai Municipal Corporation gave good news to Sarvajnik Ganesh Mandals)

हेही वाचा – अनेक महिन्यांनंतर मुंबईत कोरोना रुग्णाचा मृत्यू; डॉक्टरांनी काय दिली माहिती?

- Advertisement -

गेल्या काही वर्षांपासून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडप परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागत होता. या ऑनलाइन अर्जामध्ये असलेल्या हमीपत्रात चार फुटांपर्यंतची मूर्ती तसेच शाडू आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट घालण्यात आलेली होती. त्यामुळे अनेक गणेशोत्सव मंडळांनी यंदाच्या वर्षी या मंडप परवानग्या भरल्याच नाही. तर या हमीपत्राबाबत मुंबईतील अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी नाराज व्यक्त केलेली होती. परंतु आता या गणेशोत्सव मंडळांची ही नाराजी दूर करण्यात आलेली असून मुंबई महापालिकेकडून काही अटी काढून टाकत नवीन हमीपत्र जारी केलेले आहे. या नवीन हमीपत्रातून सर्वात महत्त्वाची अट म्हणजेच गणेश मूर्तींची उंची आणि पर्यावरणपूरक मूर्तींची अट काढून टाकण्यात आलेली आहे.

गणेशोत्सव मंडळाकडून नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेकडून सुधारित हमीपत्र तयार करण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे. जुन्या हमीपत्रामध्ये प्रतिष्ठापना करण्यात येत असलेली चार फुटांपर्यंतची मूर्ती ही शाडूच्या मातीची आणि पर्यावरणपूरक साहित्याने साकारलेली असावी, अशी अट होती. त्यामुळे मंडप परवानगीसाठी सुरू करण्यात आलेले ऑनलाईन अर्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून अद्यापही सादर करण्यात आलेले नव्हते. या हमीपत्रातील अटींवरून मंडळांमध्ये मोठा गोंधळ निर्माण झालेला होता. परंतु गुरुवारी (ता. 10 ऑगस्ट) मुंबई महानगरपालिकेकडून नवीन हमीपत्र सादर करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने 17 मेच्या बैठकीत दिलेल्या निर्देशाप्रमाणे पीओपीची मूर्ती ठेवण्यास आक्षेप घेतला नसल्याचे बृहन्मंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहीबावकर यांनी सांगितले. मुंबई महापालिकेचे उपायुक्त आणि गणेशोत्सव समन्वयक रमकांत बिरादार यांनी नवीन हमीपत्र काढले आहे. मुंबईत गणेशोत्सवात हा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. त्यामुळे या करिता अनेक सार्वजनिक मंडळ हे दोन ते तीन महिन्यांआधीच याच्या तयारीला लागतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -