घरमुंबईMumbai Rain : मुंबईकरांची चिंता वाढू शकते; सव्वा महिन्यात 35.70 टक्के इतकाच...

Mumbai Rain : मुंबईकरांची चिंता वाढू शकते; सव्वा महिन्यात 35.70 टक्के इतकाच पाणीसाठा जमा

Subscribe

Mumbai Rain : दडी मारून बसलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील आठवड्याभरापासून मुंबईत जोरदार पाऊस (Mumbai Rain) कोसळत असून हवामान विभागाकडून पुढील तीन दिवस ऑरेंज व यलो अलर्ट देण्यात आला आहे. मात्र सव्वा महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात सध्या 35.70 टक्के इतकाच पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे पुढील सव्वा दोन महिन्यात चांगला पाऊस झाला नाही तर मुंबईकरांची चिंता वाढू शकते. (Mumbai Rain Mumbaikars may be worried 35.70 percent of water storage in One and half month )

हेही वाचा – किरीट सोमय्या कथित व्हिडीओचा पेन ड्राइव्ह नीलम गोऱ्हेंच्या हाती, म्हणाल्या – “ते बघणे म्हणजे…”

- Advertisement -

मुंबईत सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही संततधार कायम ठेवली. त्यामुळे रस्ते व रेल्वे वाहतुकीवर काहीसा परिणाम झाला. मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटे उशिराने सुरू होती. शहर व उपनगरात 13 ठिकाणी झाडे/ फांद्या पडण्याच्या, तर 3 ठिकाणी घरे/ भिंती पडण्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय 3 ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटनाही समोर आल्या आहेत. सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र पुढील दोन दिवस मुंबई शहर व उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

हेही वाचा – यापुढे बरेच काही घडणार आहे…, किरीट सोमय्या क्लिपप्रकरण संजय राऊत यांचे संकेत

- Advertisement -

…तर मुंबईकरांची चिंता वाढू शकते

मुंबईत दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात आगमन होणाऱ्या पावसाने यंदा मुंबईकरांना जून महिन्याच्या चौथ्या आठ्वडयापर्यंत प्रतिक्षा करायला लावली. अखेर 24 जून रोजी उशिरा पावसाने हजेरी लावली. संपूर्ण जून महिन्यात पावसाने अतिशय खराब कामगिरी केली. अखेर जुलै महिन्यात पाऊस जोरदार कोसळत असला तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात अपेक्षित बरसला नाही. त्यामुळे तलावात सध्या एकूण आवश्यक पाणीसाठ्याच्या 35.70 टक्के इतकाच पाणीसाठा जमा झालेला आहे.

हेही वाचा – “सगळे संजय रिकामे…” मंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

वास्तविक, मुंबई शहरात दरवर्षी संपूर्ण पावसाळ्यात सरासरी 2,300 ते 2,700 मिमी इतका पाऊस पडतो. गतवर्षी 18 जुलैपर्यंत 52 ते 53 टक्के इतका पाऊस पडला होता. मात्र यावर्षी आतापर्यंत शहर भागात फक्त 817 मिमी म्हणजे 35.40 टक्के इतका, तर उपनगरात 1,186 मिमी म्हणजे 42.63 टक्के इतका पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अद्याप पावसाळ्याचे सव्वा दोन महिने बाकी असून सदर कालावधीत उर्वरित 64.30 टक्के पाणीसाठा जमा होणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर मुंबईकरांची चिंता वाढू शकते.

मुंबईत पुढील तीन दिवस ऑरेंज व यलो अलर्ट

मुंबईत आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला होता; मात्र सुदैवाने मुंबईत जोरदार ते अतिजोरदार पाऊस बरसला नाही. मात्र उद्या पुन्हा एकदा ऑरेंज अलर्ट, तर गुरुवारी आणि शुक्रवारी असे दोन दिवस हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईत काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. मुंबईकर व पालिका यंत्रणा यांना पुढील तीन दिवस सतर्क राहावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -