घरमुंबईमुंबईकर गारठले, पारा १४.२ अंशांपर्यंत आला खाली

मुंबईकर गारठले, पारा १४.२ अंशांपर्यंत आला खाली

Subscribe

मुंबईचा कडाका वाढला आहे. सध्या मुंबईकर पुन्हा एका गुलाबी थंडीचा अनुभव घेत आहे. मुंबई शहर व उपनगरातील तापमानाचा पारा वेगाने घसरत आहे. त्यामुळे मुंबईकर गारठले आहेत. आज मुंबईचं किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं आहे. तर मुंबईतील तापमानाचा पारा किमान ३.३ अंशांनी घसरला आहे. मुंबईत शनिवारीही थंडीचा जोर असेल. ९ फेब्रुवारीनंतर मात्र तापमानात आणखी बदल पाहायला मिळतील मुंबईत परतलेल्या थंडीचा जोर आणखी काही दिवस कायम राहणार, असा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

गेल्या दोन दिवसांपासून हवामान चढउतार पाहायला मिळत आहे. याबाबतचे दोन ग्राफ ट्विट हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी केले आहेत. यात सांताक्रूझ आणि कुलाबा वेधशाळेने नोंदवलेले तापमान देण्यात आले आहे. मुंबईतील तापमानाचा पारा कसा वेगाने घसरत आहे, हे या ग्राफमध्ये पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांत तापमानात सातत्याने घसरण होत आहे आणि ही घसरण सुरूच राहील असा अंदाज आहे. मुंबईकरांसाठी हे गुलाबी थंडीचे दिवस आहेत असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.

कमाल तापमान २७.५ अंश सेल्सिअस तर सांताक्रूझ वेधशाळेत कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. आज सर्वात कमी १०.६ अंश सेल्सिअस इतके तापमान पनवेलमध्ये होते तर पश्चिम उपनगरातील बोरिवलीत ११.३ व पवईत १३.५४ अंश सेल्सिअस इतका तापमानाचा पारा घसरला होता. उत्तरेकडील वाऱ्यामुळेच तापमानात घसरण पाहायला मिळत असून येते काही दिवस असेच हवामान राहणार असल्याचा अंदाज होसाळीकर यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -