घरक्रीडाIndia vs New Zealand: न्यूझीलंडचा भारतावर 22 धावांनी विजय

India vs New Zealand: न्यूझीलंडचा भारतावर 22 धावांनी विजय

Subscribe

झीलंड आणि भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी विजय झाला आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी झाले आहेत.

न्यूझीलंड आणि भारत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा २२ धावांनी विजय झाला आहे. न्यूझीलंड आणि भारत यांच्यात खेळवण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी झाले आहेत. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांची मालिका देखील गमावली आहे. रविंद्र जडेजाने भारताच्या विजयासाठी संघर्ष केला पण त्याला यश आले नाही.

- Advertisement -

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडने जिंकला आहे. त्यामुळे मालिकेतील अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे.

सलग तिसऱ्या सामन्यात विराटची दांडी गुल

अवघ्या ३४ धावांत भारताचे सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे माघारी परतले. यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीहीनेही फारशी चमक दाखवली नाही. १५ धावांवर असताना टीम साऊदीने कर्णधार विराटची विकेट उडवली. यादरम्यान सलग तिसऱ्या वन-डे सामन्यात विराट त्रिफळाचीत झाला आहे. वन-डे क्रिकेटमध्ये अशा पद्धतीने बाद होण्याची विराटची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

- Advertisement -

श्रेयस अय्यरची माघार

केदार जाधव समोर आज पु्न्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी होती. मात्र अवघ्या ९ धावा करून तो माघारी परतला. श्रेयस अय्यरनेही अर्धशतक करत पुढच्याच चेंडूवर झेलबाद झाला. त्याने ५७ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार मारून ५२ धावा करत माघार घेतली आहे.

भारताला सातवा धक्का, श्रेयसच्या पाठोपाठ शार्दूल ठाकूरची विकेट

भारताला सातवा धक्का बसला आहे, एका मागून एक खेळाडू बाद होत आहेत.  श्रेयस अय्यर अर्धशतक खेळीनंतर पुढच्याच चेंडूवर य़ष्टिचीत झाला. त्याच्या पाठोपाठच शार्दूल ठाकूरनेही माघार घेतली आहे.

जडेजा आणि नवदीप सैनी अर्धशतकी भागीदारी

जडेजा आणि नवदीप सैनी यांनी आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करत संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी ७६ धावांची भागीदारी केली. जडेजाने सामान्याची सर्व सूत्र हाती घेताना अर्धशतक पूर्ण केले आहे. भारतातर्फे यजुवेंद्र चहलने सर्वाधिक म्हणजेच ३ बळी मारले तर शार्दूल ठाकूरने २ बळी आणि रवींद्र जाडेजाने एक बळी टिपला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -