घरमुंबईमालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिकेची अभय योजना जारी

मालमत्ताकर थकबाकीदारांसाठी महापालिकेची अभय योजना जारी

Subscribe

मालमत्ताकराची रक्कम आणि ७५ टक्के सवलत वगळून उर्वरित २५ टक्के दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरावी लागणार आहे. टप्प्याटप्प्याने भरणा भरल्यास त्या रकमेस अभय योजना लागू होणार नाही. त्याचप्रमाणे नागरिकांनी १५ फेब्रुवारीची वाट न पाहता योजना लागू झाल्यापासून पंधरा दिवसातच योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

मालमत्ता थकबाकिदारांना दिलासा देण्यासाठी नवी मुंबई महापालिकेडून मालमत्ता अभय योजना २०२०-२०२१ लागू करण्यात आली आहे. १५ डिसेंबर २०२० ते १४ फेब्रुवारी २०२१पर्यत या दोन महिन्याकरिता ही योजना असणार आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. त्याचप्रमाणे नागरिकांकडून कर स्वरूपात जमा होणाऱ्या निधीतून महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा पुरवल्या जात होत्या. महापालिकेच्या मुख्य स्त्रोत असलेल्या मालमत्ताकराची वसूलीही कमी झाली होती . या गोष्टी लक्षात ठेवून नागरिकांना दिलासा देण्यासाठी आणि कररूपाने जमा होणाऱ्या निधीतून दर्जेदार सुविधापूर्ती करण्याच्या दृष्टीने दोन महिन्यासाठी अभय योजना जाहिर करण्यात आली आहे.

मालमत्ता थकबाकी असणाऱ्या नागरिकांनी आपल्या मालमत्ता थकीत रक्कम अधिक २५ टक्के दंडात्मक रक्कम भरल्यास त्यावर ७५ टक्के दंडात्मक रक्कमेवर सूट मिळणार आहे. अभय योजनेसाठी कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. मालमत्ताकराची रक्कम आणि ७५ टक्के सवलत वगळून उर्वरित २५ टक्के दंडात्मक रक्कम एकाचवेळी भरावी लागणार आहे. टप्प्याटप्प्याने भरणा भरल्यास त्या रकमेस अभय योजना लागू होणार नाही. त्याचप्रमाणे नागरिकांनी १५ फेब्रुवारीची वाट न पाहता योजना लागू झाल्यापासून पंधरा दिवसातच योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

- Advertisement -

मालमत्ताकर अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे. हा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी www.nmmc.gov.in या वेबसाइटवर अर्ज भरावा लागणार आहे. त्याचप्रमाणे महापलिका मुख्यालय ८ विविध कार्यालये तसेच सर्व भरणा केंद्रा ठिकाणी रोख रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. रक्कम भरताना भारतीय रिझर्व्ह बँकेचे नियम लागू असतील. याशिवाय महापलिकेच्या http://www.nmmc.govt.in या वेबसाईटवर तसेच NMMC e-connect या मोबाईल Appवर अभय योजनेची विशेष लिंकही दिली जाणार आहे. त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकिंग / एनईएफटी/ आरटीजीएसच्या माध्यमातून कराचा भरणा करता येणार आहे. थकबाकीदारांनी नवी मुंबई शहराच्या विकासात आपेल योगदान द्यावे असे अवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.


हेही वाचा – हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणारे ६ अध्यादेश, १० विधेयके कोणती?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -