घरमुंबईहोर्डिंग, बॅनर्स, पोस्टर विरोधात पालिकेची कारवाई; 373 प्रकरणांत FIR दाखल

होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर विरोधात पालिकेची कारवाई; 373 प्रकरणांत FIR दाखल

Subscribe

मुंबईच्या सौंदर्याला बाधक आणि पालिका परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग,बॅनर व पोस्टर्स यांवर महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने कारवाई करून ते हटवण्यात आले आहेत.

मुंबई: मुंबईच्या सौंदर्याला बाधक आणि पालिका परवानगीशिवाय लावण्यात आलेल्या अनधिकृत होर्डिंग,बॅनर व पोस्टर्स यांवर महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशाने कारवाई करून ते हटवण्यात आले आहेत. तसेच, ३७३ प्रकरणात पोलिसांत एफआयआर तर ७८२ प्रकरणात संबंधितांविरोधात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे, २,३३८ व्यावसायिक, ८,७७९ धार्मिक आणि ४,४९७ राजकीय अशा एकूण १५,७१४ पोस्टर्स आणि बॅनर हटविण्यात आले आहेत. (Municipal action against hoardings banners posters FIR lodged in 373 cases)

…म्हणून पालिकेनं केली कारवाई 

मुंबईत गणेशोत्सव कालावधीत अनेक ठिकाणी पालिकेच्या परवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आले होते. ते मुंबईच्या सौंदर्याला बाधक ठरत होते. त्यामुळे पालिका आयुक्त चहल यांनी, सदर अनधिकृत होर्डिंग, बॅनर, पोस्टर्स दोन दिवसांत हटवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. तसेच, कारवाई करताना कोणाच्याही दबावाला बळी न पडता कारवाई करावी, असे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.

- Advertisement -

विना परवाना होर्डिंग्सवर कारवाई 

त्याचप्रमाणे, मुंबई उच्च न्यायालयानेही मुंबईत परवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर्स लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. मात्र त्यानंतरही मुंबईत राजकीय कार्यक्रम असो की धार्मिक उत्सव आदी प्रसंगी विनापरवानगी होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर्स लावले जात आहेत. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव आणि ईद निमित्तानेही विविध राजकीय पक्षातर्फे, नेत्यांमार्फत रस्ते, चौक, सिग्नल आदी ठिकाणी विना परवानगी होर्डिंग, बॅनर आणि पोस्टर्स लावण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. अखेर पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या आदेशानुसार, वरीलप्रमाणे विना परवानगी होर्डिंग, बॅनर, पोस्टर आदी विरोधात पालिकेतर्फे कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा: अजित पवार गटातील वाद चव्हाट्यावर; वळसे पाटलांसमोरच मिटकरी-मोहोडांमध्ये खडाजंगी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -